पश्चिम महाराष्ट्र

भेसळयुक्त दुध उत्पादकांवर अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाची कारवाई

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे दुध संकलन कमी झाल्याची ओरड होत असताना दुध संकलन केंद्रानी मात्र भेसळ करून दुध विकण्याचा सपाटाच लावला आहे. अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाने दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत तीन लाख तीन हजाराचा ऐवज हस्तगत केला. यामध्ये जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या मंगळवेढा केंद्राचा समावेश आहे. या पथकाची तालुक्यातील 24 तासातील ही दुसरी कारवाई आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मंगेश लवटे, डॉ. उमेश भुसे, डॉ. योगेश देशमुख यांच्या सहकार्याने पार पाडली. अधिकाऱ्यांनी पेढीची तपासणी केली असता सदर ठिकाणी सुमारे 70 बॅग Skimmed Milk Powder (प्रति बॅग 25 कि.) गाय दुधाचे एसएनएफ वाढविण्यासाठी भेसळीच्या उद्देशाने साठविण्यात आल्याचे आढळले. तरी सदर स्किम्ड मिल्क पावडर चा सुमारे 1 हजार 748 किलो चा सुमारे 2 लाख 62हजार 200 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

सदर ठिकाणी दुधाचे 3 व एसएमपी चा एक असे एकूण 4 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तालुक्यात काल रात्री गुंजेगाव येथे मे. विजया महिला दूध संकलन केंद्र या ठिकाणी धाड टाकली. सदर ठिकाणी दूध भेसळीबाबत संशयित दुधाचा साठा आढळून आला. अधिक सखोल चौकशीअंती पेढी मालकाच्या घरी तपासणी केली असता तेथे Whey Permeate Powder चे 3 पोते प्रत्येकी 25 किलो चे आढळून आले. त्यानंतर पेढीतून गाय दूध, म्हैस दूध व पावडर यांचे नमुने घेऊन उर्वरित गाय दूध- 998 लिटर दुध, किंमत रुपये- 24 हजार 950, म्हैस दूध- 198 लिटर, किंमत रुपये 6 हजार 930 व पावडर किलो- 73 किलो, किंमत रुपये- 9 हजार चा साठा अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नुसार जप्त करून ताब्यात घेतला.

दूध हे नाशवंत असल्याने व भेसळीच्या संशयावरून ते 1196 लिटर दूध घटनास्थळीच नष्ट केले. सदर पेढीने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे परिशिष्ट 4 चे उल्लंघन केले असल्याने व भेसळयुक्त दूध स्वीकारल्याचे तसेच भेसळ करीत असल्याच्या संशयावरून पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ बंद करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलच्या गोलंदाजीपुढे बेंगळुरूचे फलंदाज ढेपाळले; अर्धा संघ झाला बाद

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT