Fear of four cows entering Ankalkhop area 
पश्चिम महाराष्ट्र

अंकलखोप परिसरात चार गवे शिरल्याने भीती

वैभवकुमार यादव

अंकलखोप : अंकलखोप (ता. पलूस) परिसरातील वैभवनगर व रामराव नगर शेती शिवारात काल (ता. 24) रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास चार गव्यांचे दर्शन झाले. रात्री उशिरा शेतीचा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर नागरिकांना आपल्या शेताकडे जात असताना त्यांना गवे दिसले. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 

हालगी परिसरातील तरुण रात्री वाहनातून घरी निघाले होते. त्यांना सर्वप्रथम गवे दिसले. वाहनाचे दिवे व आवाजामुळे ते उसात शिरले. घरी जाऊन त्यांनी गावात माहिती दिली. दिलीप भाऊसो यादव यांनी सरपंच अनिल विभूते यांना याबाबत माहिती दिली. सरपंचांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधून गवे दिसल्याचे सांगितले. वनपालांनी ग्रामस्थांनी गव्यांच्या मागे लागू नये. जसे आले तसे ते दुसरीकडे निघून जातील. दरम्यान, गवे आल्याची माहिती मिळताच हुतात्मा भगतसिंह हायस्कूल परिसरात काही तरुण मोबाईलवर चित्रीकरण करू लागले. मात्र शिवव्याख्याते अतुल पाटील यांनी त्यांना घरी पाठवले. 

अंकलखोप येथे ऊस पिकांचे मोठे क्षेत्र आहे त्यामुळे त्या लपण्यासाठी खूप जागा आहे. नदीकाठ परिसरात शेतकऱ्यांची घरेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच इतर नागरिकांची या रस्त्यावर ये-जा सुरू असते. त्यामुळे या जंगली गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागठाणे- आष्टा रस्त्यावर गवा आढळलेला होता. 

आज सकाळी गवे दिसलेल्या परिसरात वनपाल ढेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी सरपंच श्री. विभूते व वनपाल श्री. ढेरे यांनी ग्रामस्थांना, "गव्यांना नाहक त्रास देऊ नका. ते आले तसे ते निघून जातील. फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू नका' असे आवाहन केले.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर; अशक्य वाटणाऱ्या कल्पनेला वास्तवात आणलं...

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मेट्रो डब्यांची संख्या वाढणार, घाटकोपर-वर्सोवादरम्यान सहा डब्यांची ट्रेन धावणार

Japanese Hair Care: जपानी महिलांच्या सिल्की-शायनी केसांचे रहस्य काय? १ रुपयाही खर्च न करता ट्राय करा 'या' ६ सोप्या ट्रिक्स...

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT