Fear of wastage of farm produce in case of lockdown again 
पश्चिम महाराष्ट्र

पुन्हा लॉकडाऊन झाल्यास शेतमाल वाया जाण्याची भिती

पोपट पाटील

इस्लामपूर : कोरोनाची दुसरी लाट येऊन पुन्हा लॉक डाऊन पडणार अशी माहिती प्रसार माध्यमाद्वारे समोर येत असल्याने नुकताच सावरलेल्या शेतकर्याचे पुन्हा धाबे दणाणले आहे. मोठ्या कष्टाने उभी केलेली पिके लॉकडाऊन पडल्यास तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्‍यता आहे. 

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने इस्लामपूर शहरात शिरकाव केला होता.ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात संपूर्ण तालुक्‍यात कोरोनाने थैमान घातले होते. सात महिन्याच्या कालावधीत जिल्हा बंदी, संपूर्ण राज्यात बाजरापेठ बंद होत्या. शेतकऱ्यांच्या मालाला बाजार पेठच उपलब्द नसल्याने शेतातील उभ्या पिकावर नांगर फिरवावा लागला.यात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. 

यामधून नुकताच कसाबसा शेतकरी सावरला आहे. मोठ्या आशेने जोमाने कामाला लागून पिके उभी करण्यात सुरवात केली आहे. इथून पुढील काळात चांगला भाव मिळेल या आशेने भाजीपाला लागण केली. सवरतोय न सवरतोय तो पर्यंत पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

उभी केलेली भाजीपाला पिके पुन्हा लॉकडाऊन पडला तर काय करायची या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने चार महिने कालावधीत उत्पादन सुरू असणाऱ्या भाजीपाला पिकांना त्याचा धोका जास्त आहे. यात काकडी, वांगी, भेंडी, दोडका, कारले यांचा समावेश होतो. या पिकांसाठी एक ते दीड लाख रुपये पर्यंत खर्च केला जातो. एवढे करून उत्पादन सुरू होण्याच्या वेळीच लॉक डाऊन पडला तर बाजारपेठा ठप्प होऊन शेतमाल हातचा वाया जाण्याची शक्‍यता आहे. 

"कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात 20 गुंठे टोमॅटो,20 गुंठे वांगी हे पीक घेतले होते. लॉक डाऊन, संचार बंदी याचा फटका बसून साधारण 5 लाख रुपयांचा तोटा झाला होता. त्यातून सावरत एक महिन्यापूर्वी तीस फ्लावर भाजीपाल्याची लागण केली आहे. विक्रीच्या वेळी नेमका लॉक डाऊन पडला तर पुन्हा एकदा आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे." 
- सचिन म्हस्के, भाजीपाला उत्पादक शेतकरी, नेर्ले.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT