पश्चिम महाराष्ट्र

कोकटनूरला बनावट खत विक्री: दुकान, गोदाम सील

१७१ पोती जप्त; कृषी खात्याची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बनावट खताची विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करून दुकान व गोदाम सील करण्यात आले आहे. सोमवारी (ता.९) कृषी खात्याच्या जागृती पथकाने कोकटनूर (ता. अथणी )(Koktanur Ta. Athani) येथे ही कारवाई केली.

कोकटनूरला वीरभद्रेश्वर कृषी सेवा केंद्रात बनावट खताची विक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती कृषी खात्याच्या जागृती दलाला मिळाली होती.

कारवाई दरम्यान १७१ बनावट खताची पोती जप्त केली असून, याप्रकरणी दुकान चालक कल्लया ब. मठपती याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमुळे खत विक्री दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

कोकटनूरला वीरभद्रेश्वर कृषी सेवा केंद्रात बनावट खताची विक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती कृषी खात्याच्या जागृती दलाला मिळाली होती. त्यानुसार काल अधिकाऱ्यांनी सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी फॅक्ट कंपनीच्या बनावट अमोनियम सल्फेट खताची विक्री होत असल्याचे आढळले. यावेळी १७१ खताच्या पोत्यांची इनव्हाइस नसल्याचेही आढळून आले. त्यामुळे सदर १७१ पोती खत जप्त करून गोदामाला सील ठोकले.

केंद्र सरकारने अमोनियम सल्फेट या खताची किंमत प्रति ५० किलो साठी ८५० रुपये निर्धारित केली आहे. मात्र, खताच्या पोत्यावर ८७५ ते ११०० रुपये पर्यंत दर लिहिला होता. त्यामुळे खताचे नमुने प्रयोगशाळेला पाठवले असून दुकान मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील खत विक्री दुकानदारांना परवान्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. त्यामुळे चढ्या दराने व बनावट खत व बियाण्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

SCROLL FOR NEXT