ashtekar-desai fight 
पश्चिम महाराष्ट्र

VIDEO : त्या दोघींत इंदोरीकारांठी फाईटचा वार ठरला, वेळही ठरली पण... 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. काहीजणांनी विपर्यास केल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, त्यांच्यावरून उठलेल्या वादाचे मोहोळ घोंगायचे थांबलेले नाही. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर यांनी इंदोरीकरांच्या बाजूने उभे राहत तृप्ती देसाई यांना ठोकून काढण्याची भाषा केली होती. देसाई यांनीही ते आव्हान स्वीकारले होते. तारीख आणि वेळ सांगा तिथे येते, असेही प्रतिआव्हान दिले होते. 

इंदोरीकरांच्या समर्थनार्थ सोशल मीडियातील मोहीम जोरदार सुरू आहे. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचाच, असा चंग देसाई यांनी बांधला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी त्या नगरच्या दिशेने निघाल्याचे अष्टेकर यांना माहिती झाले. त्यांनीही पुण्याच्या दिशेने जात सुपा टोलनाक्‍यावर ठाम मांडले. देसाई आल्या तर तिथेच ठोकून काढायचे असाच त्यांचा बेत होता. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील बाका प्रसंग टळला.

इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याबाबत तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. त्यामुळे महाराजांचे समर्थक त्यांच्यावर चिडले आहेत. काहींनी तर फेसबुकवर "पोल' क्रिएट केला आहे. काही ग्रुपवर देसाई यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली जात आहे. दरम्यान, आमच्या जिल्ह्यात येऊन अशी नाटकं करायची नाहीत. इंदोरीकर महाराजांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केलं आहे. लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. या वक्तव्याबाबतचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल होत होता. 

इंदोरीकरांना माफी नाही 
इंदोरीकर महाराजांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना माफ करणार नाही. कारण त्यांची एक चूक नाही. ते वारंवार महिलांना कमी लेखतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणारच आहे, अशी भूमिका भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कायम ठेवली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक, बंगळूरस्थित कंपनीकडून घेतली लाच

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

SCROLL FOR NEXT