पश्चिम महाराष्ट्र

धडाकेबाज चित्रपटातल्या कवठ्या महाकाळचं सांगलीतल्या गावाशी कनेक्शन कसं?

धडाकेबाज सिनेमातील खलनायकाचे नाव ठरले सांगली जिल्ह्यातील गावाच्या नावावरून

सकाळ वृत्तसेवा

सांगली : महेश कोठारे आणि त्यांच्या पाच अक्षरी सिनेमांची मालिका महाराष्ट्राने डोक्‍यावर घेतली. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे या जोडीने त्या काळात धुमाकूळ घातला होता. त्या सुपरहिट सिनेमांपैकीच एक होता धडाकेबाज. बाटलीत बंद झालेला गंगाराम, धडाकेबाज लक्ष्याची जोरदार कामगिरी आणि एकापेक्षा एक गाण्यांमुळे हा सिनेमा जोरात चालला. या सिनेमातील खलनायकही तितकाच ठसा उमटून गेला आणि राज्यातील मराठी प्रेक्षकांच्या मनावर तो आजही राज्य करतो आहे. त्या खलनायकाचे नाव सांगली जिल्ह्यातील एका गावाच्या नावावरून ठेवले गेले होते.

खरं तर हा किस्सा महेश कोठारे यांनी एका मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात सांगितले. त्यांच्या पाच अक्षरी सिनेमातील खलनायकांची नावे हटके कशी असतात, याबाबत ते सांगत होते. टकलू हैवान गॅंग, तात्या विंचू अशी नावे आजही लोकांच्या तोंडात आहेत. त्यात कवट्या महाकाळ हे नाव कुणीच विसरलेले नाही. हे नाव कसे सूचले हे सांगताना, महेश कोठार यांनी सांगली जिल्ह्याचा उल्लेख केला. या जिल्ह्यातून जात असताना त्यांना कवठेमहांकाळ हे गाव लागले. हे नाव वाचताच त्यांना त्यांच्या धडाकेबाज सिनेमातील खलनायकासाठीचे नाव सूचले आणि कवठ्या महाकाळचा जन्म झाला.

कवठेमहांकाळ हे सांगली जिल्ह्यातील एक तालुक्‍याचे गाव आहे. हा तसा दुष्काळी तालुका, मात्र अलिकडे म्हैसाळ आणि टेंभू योजनेचे पाणी आल्यामुळे समृद्धीच्या मार्गाने वाटचाल करतोय. नव्याने सुरु असलेल्या रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील हे गाव आता द्राक्ष शेतीसाठी प्रसिद्ध झाले आहे. राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी याच मतदार संघातून शेवटचा विजय मिळवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

Sangli Atrocity Case: संगीतकार पलाश मुच्छलवर सांगलीत ॲट्रॉसिटीखाली गुन्हा; २५ लाखांच्या व्यवहारातून जातिवाचक शिवीगाळ प्रकरण

Producer R B Choudary Passed Away : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; सुप्रसिद्ध निर्माता आर.बी. चौधरी यांचे अपघातात निधन

SCROLL FOR NEXT