पश्चिम महाराष्ट्र

मिरजेत पोलिसदादाने ट्रकचा केला फिल्मी स्टाईल पाठलाग

सकाळ वृत्तसेवा

मिरज - वाहनांनी गजबजलेला शिवाजी रस्ता, त्यातून भरधाव धावणारा मालवाहू ट्रक आणि त्याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करणारा वाहतूक पोलिस. मिरजेतील शिवाजी रस्त्यावर आज सकाळी अकरा वाजताचे हे दृश्‍य. अवघ्या मिरजकरांनी स्वतःचा जीव मुठीत धरून ही शर्यत पाहिली. 

पंढरपूर रस्त्यावरून येऊन शहरात प्रवेश करणाऱ्या राजस्थानी 
ट्रकला गांधी चौकात वाहतूक पोलिसाने शिटी मारली. दहा-बारा राज्यांचे पाणी पिलेल्या ट्रकचालकाने शिट्टीकडे कानाडोळा केला. गाडी तशीच पुढे दामटली. पण मिरजेच्या पोलिसाच्या शिट्टीकडे दुर्लक्ष करणे त्याला चांगलेच महागात पडले. पित्त खवळलेल्या पोलिसदादाने बुलेट काढली. ट्रकचा पाठलाग सुरू केला.

ट्रकची गती कमीच होती; पण वाहतूक कोंडीमुळे बुलेट पुढे काढता येत नव्हती. सुमारे पाच- दहा मिनिटांच्या पाठशिवणीनंतर हिरा हॉटेल चौकात अखेर पोलिसदादाला यश आले. बुलेट भुर्रकन पुढे घेत थेट ट्रकच्या आडवी आणून थांबवली. रस्ताच रोखल्याने ट्रकचालकाचा नाईलाज झाला. भररस्त्यातच ट्रक थांबवला. पोलिसदादाने त्याला खाली उतरायला फर्मावले. कागदपत्रांची मागणी केली. तोपर्यंत मागे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हॉर्नच्या केकाटण्याने चौक दणाणून गेला होता. पोलिसदादाला त्याची फिकीर नव्हती. शहरात दामटून घुसलेल्या ट्रकची तपासणी महत्त्वाची होती. न जाणो ट्रकमध्ये बेकायदा माल असावा किंवा ट्रक चोरीचाही असावा. साहेबांनी यथासांग चौकशी केली, ट्रक पुढे दामटल्याबद्दल कायदेशीर विचारणाही केली. अखेर कायदेशीर तडजोड झाली. ट्रकचालकाला दिलासा मिळाला. अख्ख्या मिरजकरांनी वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यतत्परतेचे दिवसभर कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT