Finished stories before they started 
पश्चिम महाराष्ट्र

सुरु होण्याआधी संपली कहाणी

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर (नगर ) ः ती अत्यंत बोलकी, चटपटीत. दुचाकीवरून खड्ड्यात पडल्याचे निमित्त झाले. पडताना दुचाकीच्या हॅंडलचा पोटाला मार लागल्याने यकृताला जखम झाली. शस्त्रक्रिया झाली; पण तिला वाचविण्याचे मानवी प्रयत्न तोकडे पडले. डॉक्‍टर होऊन समाजसेवा करण्याचे तिचे स्वप्न नियतीने हिरावून घेतले. एक डाव अर्ध्यावरतीच मोडला. आणखी एक कहाणी अधुरीच राहिली..! 


ऋतुजा मच्छिंद्र आरोटे (वय 18, रा. देवकौठे) असे या अभागी तरुणीचे नाव. वडील प्राथमिक शिक्षक. ऋतुजा लहानपणापासूनच हुशार. सतत बोलकी. मोठेपणी डॉक्‍टरच होणार, असा तिचा निर्धार होता. देवकौठे येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात तिचे शिक्षण झाले. दहावीत तळेगाव केंद्रात ती पहिली आली होती. सह्याद्री महाविद्यालयात बारावी सायन्स शाखेतून 93 टक्के गुण मिळवून तिने पहिला क्रमांक मिळण्याची परंपरा कायम ठेवली. वैद्यकीय शिक्षणासाठीची पात्रता परीक्षाही ती उत्तीर्ण झाली. "बीएएमएस'साठी तिला प्रवेश मिळत होता; पण तिचे स्वप्न मोठे होते. "एमबीबीएस' होण्याच्या जिद्दीने "गॅप' घेऊन ती पुन्हा लोणी (ता. राहाता) येथे प्रवेश परीक्षेच्या तयारीला लागली. 

दुसरीकडे नियतीच्या मनात काही वेगळंच सुरू होतं. अकरावीत शिकणाऱ्या लहान भावाला चिंचोली गुरव येथून आणण्यासाठी रविवारी (ता. 8) सायंकाळी ती दुचाकीवर गेली. भावासह घरी येताना देवकौठे ते चिंचोली गुरव रस्त्यावरील खाडे पोल्ट्री फॉर्मजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला तिने साइड दिली; मात्र त्याच वेळी तोल सुटल्याने दोघेही बहीण-भाऊ रस्त्याच्या कडेला असलेल्या 10 फूट खोल खड्ड्यात दुचाकीसह कोसळले. त्यानंतरही दुचाकी खड्ड्यातून बाहेर काढून ती चालवीत पुन्हा घरी आली. 

खड्ड्यात कोसळताना दुचाकीचा हॅंडल तिच्या पोटाला लागला होता. त्यामुळे यकृताला जखम झाली. प्रचंड वेदना ती सहन करीत होती. वडील मच्छिंद्र आरोटे यांनी तिला उपचारासाठी प्रथम वावी येथे, तेथून सिन्नर व नंतर नाशिकला हलविले. रविवारी रात्रीच तिच्या यकृतावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, रक्तदाब खालावल्याने प्रकृती चिंताजनक होत गेली. अखेर काल (मंगळवारी) सकाळी सात वाजता मृत्यूशी चाललेली तिची झुंज संपली. एक उमलतं स्वप्न विरून गेलं. नियती जिंकली..!  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT