पश्चिम महाराष्ट्र

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा

अकलूज (सोलापूर) : उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर (शिवसेना) यांच्यासह हिंमतराव पाटील, रवी पाटील आणि आठ ते 10 अनोळखी व्यक्तींवर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सध्या अकलूज ठाण्यात अटकेत असलेल्या सतीश दंडनाईक यांनी तक्रार नोंदविली आहे. 
कळंब पंचायत समितीचे सदस्य माळेवाडी बोरगाव येथे हिंमतराव अशोकराव पाटील यांच्या बंगल्यावर आले होते. ते स्वखुशीने आले की जबरदस्तीने आणले गेले, याबाबत खात्री करण्यासाठी गणेश भातलवंडे व चालक पोपट चव्हाण यांच्यासमवेत मी तेथे गेले असता हिंमतराव पाटील, रवी पाटील व आठ ते 10 अनोळखी साथीदार अंगावर धावून आले, तिघांनाही मारहाण केली. या वेळी पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोबाईलवरून आपल्याला पकडले असल्याचे सांगितले. ओमराजे यांनी "त्याला सोडू नको धडा शिकव' असे स्पीकर फोनवर ओरडून सांगितले. त्यानंतर पाटील यांनी सत्तूर डोक्‍यात घातला; परंतु प्रसंगावधान राखून तो चुकविल्याने आपण वाचलो असल्याचे दंडनाईक यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

तालुक्‍यात उलटसुलट चर्चा 
याआधी हिंमतराव पाटील यांनी आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर 11 जणांवर अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात पोलिसांनी अटक केलेल्या सतीश दंडनाईक यांनी ही तक्रार केली असल्याने तालुक्‍यात उलटसुलट चर्चा होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Congress: चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होणार; पक्षातला अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

7 Minute 11 Second व्हायरल MMS पासून ते 'धुरंधर 2' सीन लीक क्लिपपर्यंत...जानेवारीमध्ये 'हे' टॉप 10 व्हिडिओ होते ट्रेंडिंग

"आमच्या प्रेमात ज्ञानदाने खूप सोसलं" होणाऱ्या नवऱ्याने सांगितली लव्हस्टोरी "आमच्या कास्ट वेगळ्या.."

Latest Marathi News Live Update: लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

Palghar Fire: पालघरमध्ये आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट! फर्निचर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, Viral Video

SCROLL FOR NEXT