FIR filed against that female police officer... why? 
पश्चिम महाराष्ट्र

त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा... का?

सकाळवृत्तसेवा

तासगाव : मुंबई पोलिसमध्ये कार्यरत असलेली महिला पोलिस एका भाजीपाल्याच्या वाहनातून मुंबईमधून तासगाव (जि. सांगली) येथे विनापरवाना आली. याप्रकरणी संबंधित महिलेवर विनापरवाना तसेच संचारबंदीभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेला इन्स्टिट्यूशनल क्वांरटाईन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत तासगाव तालुक्‍यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. 

मुंबई पोलिसमध्ये एसआयटी पथकात नियुक्तीवर असलेली ही महिला पोलिस काल एका भाजीपाल्याच्या वाहनातून विटा आणि तेथून तासगाव वृन्दावन कॉलनी येथे आल्याची माहिती तासगाव पालिका प्रशासनाला मिळाली. पालिका पथकाने त्वरित धाव घेऊन ही माहिती पोलिस आणि ग्रामीण रुग्णालयाला दिली.

दरम्यान, ही माहिती मुंबईहून जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षालाही मिळालेली होती. ही माहिती मिळताच तातडीने वैद्यकीय पथकाने तपासणी करून मिरज येथे पाठविण्यात आले. तेथे स्वॅबचा नमुना घेण्यात आला असून, हा महिला पोलिसला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तासगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तासगाव शहरातील 24 जणांना यापूर्वी होम क्वारंटाईन करण्यात आले होते, तर शहरातील 1 जणाला इन्स्टिट्यूशनल क्वांरटाईन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत पुन्हा तासगाव तालुक्‍यात येणाऱ्याची संख्या वाढली आहे. अनेकदा आपल्याकडे आलेल्यांची माहिती नातेवाईक देताना दिसत नाहीत, मात्र त्यामुळे धोक्‍याची घंटा वाजू लागली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT