FIR filed on the drivers of those two minibuses ... why? 
पश्चिम महाराष्ट्र

त्या दोन मिनीबसच्या चालकांवर गुन्हा... का?

सकाळवृत्तसेवा

कोकरुड (जि. सांगली) : कोरोनाच्या पश्वभूमीवर जिल्हा बंदी असताना परवाण्यापेक्षा  जास्त प्रवाशी घेऊन प्रवास केल्या बद्दल तसेच जिल्हाबंदी आदेश न पाळलेच्या कारणावरुन मुंबईहुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन मिनीबसच्या चालक यांच्यावर गुन्हा दाखल केला असून दोन्ही मिनीबस कोकरुड पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. 

कोकरुड पोलिसांनी दिलेली माहीती अशी की,सांगली -सातारा जिल्हा हद्दिवर मेणीफाटा (ता. शिराळा) येथे नाकाबंदी ठिकाणी असलेल्या चेक पोस्ट सर्व वाहनांची तपासणी करत असताना मुंबई येथून शिराळा तालुक्‍यात आलेल्या मिनीबसची आणि कागदपत्रे यांची तपासणी केली .

चालक अजय आनंदा गुरव (वय 33 रा. मानखुर्द मुंबई) याने मिनीबस (एम एच 04 एच वाय 7096) व दूसरी मिनीबस (एम एच 03 सी व्ही 7096) चालक अमोल जगन्नाथ जानकर (वय 30 रा.ट्रॉम्बे मुंबई) यांनी दोन प्रवाशांचा वाहतूक करण्याचा परवाना असताना दोन्ही मिनीबस चालक यांनी एक एक जादा प्रवाशी घेऊन प्रवास केला.

या कारणावरुन तसेच जिल्हाधिकारी यांचा राष्ट्रीय आपत्कालीन बंदी आदेश तसेच जिल्हा हद्द बंदी असतानाही प्रवेश केल्याच्या कारणावरुन दोन्ही चालकांच्यावर कोकरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याची तक्रार पोलिस नाईक संदीप भवारी यांनी दिली असून अधिक तपास करण्यात येत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT