Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation 
पश्चिम महाराष्ट्र

अग्निशमन निवासात 'पोटभाडेकरू'; अधीक्षकांसह तिघांना दंड 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर  ः अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या निवासात पोटभाडेकरू ठेवल्याचे आढळून आल्याने अधीक्षक केदार आवटे यांच्यासह तिघांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार झाला असून लवकरच कारवाई अपेक्षित आहे. 

अग्निशमन दलातील फायरमनसाठी रविवार पेठ आणि होटगी रस्ता येथे निवासस्थान उभारण्यात आले आहे. गरज भासेल तेव्हा ड्यूटीवर जायचे, या अटीवर कर्मचाऱ्यांना निवासस्थान उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, त्या ठिकाणी निवास मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी दलातीलच इतर कर्मचाऱ्यांना पोटभाडेकरू म्हणून ठेवले होते. हा प्रकार आयुक्तांना समजल्यावर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करावी, त्यांच्याकडून दंड वसूल करावा आणि अधीक्षकांना नोटीसही बजावावी, असा आदेश दिला. 

आयुक्तांच्या आदेशानंतर तातडीने हालचाली झाल्या आणि पोटभाडेकरूंनी जागा सोडली. मात्र, मूळ ज्यांच्या नावाने निवासस्थान होते त्यांच्यासह अधीक्षकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. 

महापालिकेच्या गाळ्यांतील पोटभाडेकरूंचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना, खुद्द महापालिकेच्याच निवासस्थानात हा गैरप्रकार झाल्याने कुणाचे कुणावरच नियंत्रण नाही हे स्पष्ट झाले आहे. आयुक्तांनी आदेश दिला असला, तरी प्रत्यक्षात त्याची कार्यवाही कधी होते, की प्रकरण "ऍडजेस्ट' केले जाते, हे लवकरच स्पष्ट होईल. 

आयुक्तांच्या आदेशानुसार प्रस्ताव तयार केला आहे. अधीक्षकांना हा प्रकार निश्‍चित माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांचा अहवाल आल्यानंतर दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी केली जाईल. 
- सुनील माने, अधीक्षक, सामान्य प्रशासन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT