palus firing.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

पलूसमध्ये भरदिवसा उद्योजकावर गोळीबार

सकाळवृत्तसेवा

पलूस- येथील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप आनंदराव वेताळ (वय 54) यांच्यावर आज दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी मोटारीवर गोळीबार केला. काच फुटून गोळी चालक बाजूच्या सीटमध्ये घुसली. श्री. वेताळ हे थोडक्‍यात बचावले. भरदुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 
पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, उद्योजक वेताळ यांची पलूस एमआयडीसीमध्ये फौंड्री आहे. आज सकाळी ते फौंड्रीत गेले होते. दुपारी काम आटोपल्यानंतर जेवणासाठी घराकडे मोटारीतून निघाले. मोटारीत ते एकटेच होते. स्वत: मोटार चालवत ते एमआयडीसीतून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळा नंबर एकजवळील घरासमोर आले. घरासमोर मोटार आल्यानंतर अचानक डाव्या बाजूने दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांच्या चेहऱ्याला रूमालाने बांधले होते. दुचाकीवर मागे बसलेल्या तरूणाने काचेवरून वेताळ यांच्यावर गोळीबार केला. काच फुटून गोळी आतमध्ये वेताळ बसलेल्या जागेवरील सीटमध्ये घुसली. खाली वाकल्यामुळे ते थोडक्‍यात बचावले. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात नागरिक गोळा झाले. तेवढ्यात दुचाकीस्वार पळाले. 


गोळीबाराचा आवाज ऐकून वेताळ यांच्या घरातील लोक धावले. गोळीबार झाल्याचे पाहून सर्वजण घाबरले. पलूस पोलिस ठाण्यात तत्काळ गोळीबाराची माहिती देण्यात आली. त्यामुळे सहायक निरीक्षक विकास जाधव तत्काळ घटनास्थळी धावले. तोपर्यंत बघ्यांची गर्दी जमली होती. गोळीबाराची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा डुबुले पथकासह घटनास्थळी धावल्या. त्यांनी श्री. वेताळ यांच्याकडे गोळीबाराबाबत चौकशी केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हल्लेखोर कोण होते? गोळीबार कशासाठी केला? याचा अद्याप उलगडा होऊ शकला नाही. मात्र गोळीबाराबाबत पलूस परिसरात चर्चा रंगली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

Latest Marathi News Update: एमपीएससी गैरव्यवहार चौकशी,१६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

Sakal Impact : 'सकाळ' इम्पॅक्ट; एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त, १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

SCROLL FOR NEXT