पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : एकेक म्हणता म्हणता आता सहा झाले; 'त्या' मृताचा रिपाेर्टही पॉझिटिव्हच

सकाळ वृत्तसेवा

सातारा  : सातारा जिल्ह्यात साेमवारी 63 वर्षीय रुग्णाचा कोविड-19 सह तीव्र ह्दयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान आज (मंगळवार) कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे दाखल करण्यात आलेल्या सात  अनुमानित रुग्णांपैकी 60 वर्षीय पुरुष कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर उर्वरित 6 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 

डाॅ. गडीकर म्हणाले जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधीत 9 निकट सहवासितांचे घशातील स्त्रावाचा नमुनेही निगेटिव्ह आले आहेत. तसेच सहा एप्रिलला जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोविड-19 बाधीत रुग्णाच्या चौदा निकट सहवासितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 2 रुग्ण दाखल विलगीकरण कक्षात दाखल केले आहेत.

या एकूण 16 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने  एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच काल दुपारी जिल्हा रुग्णालय सातारा येथे तीव्र जंतु संसर्गामुळे दाखल झालेला 25 वर्षीय अनुमानित अत्यावस्थ झाल्याने रात्री 1 च्या सुमारस त्याला कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असून विलगीकरण कक्षात लागू असलेल्या नियमानुसार उपचार चालू आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे. 

दरम्यान जिल्हा रुग्णालय सातारा येथे दाखल असणाऱ्या 63 वर्षीय पुरुष कोविड-19 बाधित मृत रुग्णाच्या घशातील स्त्रावाचा दुसरा नमुना एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडे तपासणीककरीता पाठविण्यात आला होता. त्याचे रिपोर्ट रात्री उशिरा प्राप्त झाला असून रिपोर्टनुसार मृत व्यक्ती ही पॉझिटिव्ह असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. या  63 वर्षीय कोविड-19 बाधित रुग्णाचा मृत्यु हा कोविड-19 सह तीव्र ह्दयविकाराच्या झटक्याने झाला  असल्याचेही श्री. गडीकर यांनी नमूद केले आहे.

लाकडे जमविण्यापासून ते सरण रचण्यापर्यंत प्रशासनाला कसरत करावी लागली. अंत्यसंस्कार गाडीसाठीही बराच वेळ खोळंबा झाला. सविस्तर वाचा या लढ्याविषयी 


मॉर्निंग वॉकवाल्यांचा आज न्यायालयात फैसला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rule From 1 August: 1 ऑगस्टपासून बदलणार अनेक नियम! LPG, रेल्वे तिकीट, बँकिंगसह 'हे' 5 मोठे बदल जाणून घ्या

महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर व्हायब्रेटर ठेवणं, हा बलात्कारच! केरळ उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, आरोपीची शिक्षा कायम...

धक्कादायक! "माझी निवड नाही झाली, मी दुःखी झालेय"; नागपूरच्या १७ वर्षीय क्रिकेटपटूने चिठ्ठी लिहून संपवले जीवन

Farmer Loan: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! कर्जमाफीच्या रकमेबाबत मोठे स्पष्टीकरण; संभ्रम कायमचा दूर, प्रशासनाने दिली महत्त्वाची माहिती

Latest Marathi News Live Update : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT