SAHITYA SAMMELAN.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

पहिले ऑनलाईन मराठा साहित्य संमेलन शनिवारी होणार...वाचा 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या' वतीने आयोजित 11 वे "मराठा साहित्य संमेलन' व पहिले ऑनलाईन साहित्य संमेलन शनिवारी (ता.27) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. कोरोना लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये समाजापुढे अनेक आव्हाने आहेत. त्याचबरोबर ताण-तणावात समाज वावरत आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजाला एक दिशा मिळावी, सकारात्मक ऊर्जा मिळावी, ताणतणाव कमी व्हावा या हेतूने साहित्य संमेलन आयोजित केले आहे.

या संमेलनाची सुरुवात शनिवार (ता.27) सायंकाळी 5 वाजता होईल. संमेलनाचे उद्‌घाटन वन अधिकारी तथा मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार (नांदेड) हे करणार आहेत. त्यानंतर प्रसिद्ध कवी शिवश्री इंद्रजित भालेराव हे मनोगत व्यक्त करतील. 11 व्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अशोक राणा (यवतमाळ) हे अध्यक्षीय मनोगत मांडतील. स्वागत प्रास्ताविक परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील (सांगली) या करतील. 

रविवारी (ता.28) पहिले चर्चासत्र "नैसर्गिक आपत्तीवर संत वाङमयातून व्यक्त झालेले उदगार' या विषयावर होईल. सत्राचे अध्यक्ष प्रा.गंगाधरजी बनबरे (पुणे), वक्ते डॉ. छाया महाले (यवतमाळ) व प्रा.डॉ. रवींद्र बेंबरे(नांदेड) असतील. सोमवारी (ता.29) दुसरे चर्चासत्र "जागतिक महामारी कोरोना नंतर साहित्यिक व सामाजिक चळवळी वर होणारा परिणाम व उपाय' या विषयावर होईल. सत्राचे अध्यक्ष डॉ. मनोज तायडे (अमरावती), वक्ते प्रा. डॉ. मंजुश्री पवार (कोल्हापूर) व डॉ. विजय चोरमारे (मुंबई) आपले विचार मांडतील.

याच दिवशी समारोपीय सत्रात ऍड. पुरुषोत्तम खेडेकर (संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ) समारोपीय मार्गदर्शन करतील. दररोज सायं. ठीक 5 वाजता "जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, महाराष्ट्र' या अधिकृत फेसबुक पेजवर "डॉक्‍टर सरोजिनी बाबर ऑनलाईन विचारपीठा'वरून कार्यक्रम सुरू होईल, https://www.facebook.com/JTSPMaharashtra/ 
या फेसबुकपेज लिंकवरून सर्वांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT