for first stage 15808 application done for gram panchayat election in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोरदार शक्‍तिप्रदर्शन ; बेळगावात पहिल्या टप्प्यासाठी १५,८०८ अर्ज

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (११) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ८,७६७ जणांनी उमेदवारी अर्ज केले. त्यामुळे, सात तालुक्‍यांत एकूण १५,८०८ अर्ज दाखल झाल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या दोन दिवसांत अर्ज भरणा प्रक्रिया संथ होती; मात्र शेवटच्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत.

अर्ज भरणा प्रक्रियेला सोमवारपासून (७) सुरवात झाली होती. पहिल्या दिवशी ६२ जणांनी उमेदवारांनी अर्ज केले होते. मंगळवारी (८) २४४ जणांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारनंतर (९) अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला. यादिवशी १,५५७ जणांनी अर्ज दाखल केले. तर गुरुवारी (१०) उच्चांकी ५,१७८ उमेदवारांनी अर्ज केले. मात्र, हा उच्चांक शेवटच्या दिवशी मोडीत निघाला.

शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली होती. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यामुळे इच्छूक उमेदवार, सूचक आणि त्यांच्या समर्थकांनी आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. एकूण ८,७६७ जणांनी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी बेळगाव तालुक्‍यातून सर्वाधिक १,८८२ अर्ज दाखल झाले. तर खानापूर- १,५०१, हुक्केरी- १,८००, बैलहोंगल - ७३०, कित्तूर - ४६७, गोकाक - १,५६१, मुडलगी - ८२६ असे अर्ज दाखल झाले. सात तालुक्‍यातील २५९ ग्रामपंचायतींसाठी एकूण १५,८०८ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत.

शनिवारी (१२) अर्जांची छाननी झाली. मात्र, वैध ठरलेल्या अर्जांची आकडेवारी रात्री उशीरापर्यंत मिळू शकली नाही. सोमवारी (१४) अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच प्रत्येक ग्रामपंचायतीतील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २२ रोजी होणार आहे. यामुळे उमेदवारांनी प्रचारासाठी आतापासूनच रणधुमाळी उडविलेली आहे. तालुक्‍यातील वातावरण ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ढवळून निघाले आहे. गावागावातून केवळ निवडणूक आणि उमेदवार तसेच जय-पराजय याचीच चर्चा सुरू आहे. 

जोरदार शक्‍तिप्रदर्शन

यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारांनी अर्ज भरतानाच शक्‍तिप्रदर्शन करून प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, प्रचारही झंझावाती होणार असल्याचे दिसून आले. अनेकजण साम, दाम, दंड, भेदाचा वापर करुन जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT