पश्चिम महाराष्ट्र

अध्यादेश जारी..! पहिल्या टप्प्यात शिवभोजनासाठी 1800 थाळींचे नियोजन

विजयकुमार सोनवणे


सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्यात शिवभोजन योजनेंतर्गत रोज 1800 थाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियु्क्त करण्यात आली असून, महापालिकेचे आयु्क्त समितीचे सदस्य, तर जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य सचिव असतील. या संदर्भातील आदेश शासनाने बुधवारी जारी केले. 

तीन महिन्यांसाठी असेल योजना
प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या तीन महिन्यांसाठी ही योजना असेल. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी किमान एक भोजनालय सुरु करण्यात येईल. दहा रुपयांत उपलब्ध होणाऱ्या या भोजनामध्ये दोन चपात्या, वरण, भाताचा समावेश असेल. 

या ठिकाणी चालविता येईल भोजनालय
सध्या सुस्थितीत सुरु असलेली खानावळ, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, भोजनालय, रेस्टारंट अथवा मेस यापैकी योजना सक्षमपणे राबविणाऱ्या संस्थेची समितीमार्फत निवड केली जाणार आहे. गरीब आणि मजूर वर्गाची वर्दळ असलेल्या ठिकाणी, तसेच जिल्हा रुग्णालये, बसस्थानके, बाजारपेठा, शासकीय कार्यालय परिसरात या थाळीची विक्री होईल याची जबाबदारी समितीमार्फत घेतली जाणार आहे. 

शहर व ग्रामीणसाठी वेग-वेगळे दर
ही योजना महाराष्ट्रातील शहर व ग्रामीण भागात राबविली जाणार असून, शहरी भागात 50 रुपये तर ग्रामीण भागात 35 रुपये थाळीचा दर असेल. समितीने नियुक्त केलेली संस्था ग्राहकांकडून फक्त 10 रुपये घेईल. उर्वरीत रक्कम त्यांना अनुदानाच्या स्वरुपात दिले जाणार आहे. हे भोजनालय दुपारी 12 ते 02 या कालावधीत सुरु राहील. शासकीय कार्यालयाच्या परिसरात असलेल्या भोजनालयात सवलतीचे भोजन घेण्यास शासकीय कर्मचाऱ्यांना बंदी असणार आहे.

जिल्ह्यानिहाय थाळ्यांची संख्या 
रायगड-अलिबाग (400), रत्नागिरी 300), सिंधुदुर्ग (150), नाशिक (1000), धुळे, नंदुरबार (प्रत्येकी 300), जळगाव, नगर (प्रत्येकी 700), पुणे (1500), सातारा (500), सांगली (450), सोलापूर (700), कोल्हापूर (600), अौरंगाबाद (500), जालना व परभणी (प्रत्येकी 300), हिंगोली (200), बीड (400), नांदेड (400), उस्मानाबाद (250), लातूर व बुलडाणा (प्रत्येकी 400), अकोला व वाशिम (प्रत्येकी 300), अमरावती (500), यवतमाळ (450), वर्धा (200), नागपूर (750), भंडारा व गोंदिया (प्रत्येकी 200), चंद्रपूर (350), गडचिरोली (150), मुंबई शहर (450), मुंबई उपनगर (1500), ठाणे (1350) व पालघर (450). 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : मेटाची जागतिक टीम आणखी काही दिवस भारतात राहणार

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT