esakal | धग कायम; बेळगावात फडकला स्वतंत्र उत्तर कर्नाटकचा ध्वज 
sakal

बोलून बातमी शोधा

Separate North Karnataka Flag to be Unfurled at Belagavi.jpg

दक्षिण कर्नाटक तुलनेत उत्तर कर्नाटकाचा विकास झाला नाही. उत्तर कर्नाटकातील विविध जिल्हे मागास आहेत. विकास खुंटला आहे. त्यासाठी विकास करा, अन्यथा स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची घोषणा केली जावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

धग कायम; बेळगावात फडकला स्वतंत्र उत्तर कर्नाटकचा ध्वज 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


बेळगाव ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि विशाल गोमंतक मागणी जोर धरू लागलेली असतानाच स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची घोषणा केली जावी, या मागणीसाठी स्वतंत्र उत्तर कर्नाटक चळवळ समितीने स्वंतत्र उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज बेळगावात फडकविला. यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून ध्वज जप्त केला. 

हे पण वाचा - महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री बरळले

स्वतंत्र उत्तर कर्नाटक समितीचे जिल्हाध्यक्ष अडवेश इटगी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते एकत्र आले. 1 नोव्हेंबरला स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची घोषणा केली जावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. त्यासोबत ध्वजही फडकाविला. पोलिसांनी त्याला आक्षेप घेत कार्यकर्त्यांना रोखले. दक्षिण कर्नाटक तुलनेत उत्तर कर्नाटकाचा विकास झाला नाही. उत्तर कर्नाटकातील विविध जिल्हे मागास आहेत. विकास खुंटला आहे. त्यासाठी विकास करा, अन्यथा स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची घोषणा केली जावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. याची दखल घेत सिध्दरामय्या आणि एच. डी. कुमारस्वामी राज्याचे मुख्यमंत्री असताना विविध मंत्रालये बेळगावात स्थापण करण्याची घोषणा केली. विकास निधीची मागणी केली. पण, त्याची पुर्तता झाली नाही. शिवाय त्या दिशेने हालचालही सुरु नाही. त्यामुळे इटगी आणि कार्यकर्ते आज (ता.1) दुपारी एकत्र आले. हिरवा, पिवळा आणि केसरी रंग समाविष्ट असलेला ध्वज फडकविला. हिरेबागेवाडी पोलिस हद्दीमध्ये आंदोलक जमल्यामुळे हिरेबागेवाडी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. 

हे पण वाचा- PHOTOS : सांगलीच्या तलवारबाज मर्दानीची ऑलिंपिकसाठी घोडदौड...

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर गोळ्या घालण्याचे वक्तव्य अलिकडे करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात तणाव आहे. निदर्शने, निषेध नोंदविले जात आहेत. त्यात काही दिवसांपासून विशाल गोमंतकासाठी सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्नाटकातील कारवार आणि जोयडा भाग गोव्याला जोडण्याची मागणी जोर धरली आहे. कोंकणी नेते आणि कार्यकर्त्यांनी आघाडी घेतली आहे. त्यामध्ये आता स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी सुरु आहे. यामुळे उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यात एकावेळी विविध मागण्या व प्रश्‍नांसाठी राज्याची शकले पाडली जावी, अशी मागणी केली जात आहे.

हे पण वाचा कोल्हापूर ‘लोकल टू ग्लोबल’ बनविण्याचा असा हा ध्यास...

उमेश कत्ती यांनी केली पहिल्यांदा मागणी

स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते उमेश कत्ती यांनी सवर् प्रथम केली आहे. त्यांनी उचलून धरलेल्या विषयाला उत्तर कर्नाटकातील विविध संघटना, नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची निर्मिती झाल्याशिवाय विकास शक्‍य नसल्याचा दावा कत्ती यांनी केला. त्यांनी टाकलेली ठिणगी उत्तर कर्नाटकातील विविध राज्यात पेट घेतली आहे. त्याचाच एकभाग म्हणून आज परत आंदोलने झाले. 

हे पण वाचा- दिवंगत मित्राला अनोख्या उपक्रमातून वाहिली श्रद्धांजली, तरूणांचे  काैतूक 

कोडगूला स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करा

कोडगू जिल्ह्यामध्ये दरवर्षी एक नोव्हेंबरला काळा दिन पाळला जातो. कोडगूसह अन्य जिल्ह्यातून या दिवशी आंदोलन करून स्वतंत्र राज्याची मागणी केली जाते. पण, येथील आंदोलनही कर्नाटक सरकार मोडून काढण्याचा सातत्याने प्रयत्न करते. लोकशाही पध्दतीने आंदोलन करणाऱ्यांना कारवाईची भिती घातली जाते. एकूणच विकास, भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी राज्यात विविध जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या संघटना रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदवित आहेत. 

loading image