shanishingnapur temple closed 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाची शनिलाही साडेसाती, ४०० वर्षांत पहिल्यांदाच दर्शन बंद

सकाळ वृत्तसेवा

सोनई : कोरोना व्हायरसला पायबंद म्हणून आज शनिशिंगणापुर येथील शनिदर्शन सायंकाळच्या आरती सोहळ्यानंतर बंद करण्यात आले. एकादशीची कीर्तन सेवा व गुढीपाडवा यात्राही रद्द करण्यात आली आहे. चारशे वर्षांनंतर प्रथमच शनिदर्शन बंद होत आहे. 

राज्यातील अनेक देवस्थानने मंदीर बंद करुन दर्शन बंद केल्यानंतर आज दुपारी शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत सायंकाळच्या आरती सोहळ्यानंतर पुढील आदेशापर्यंत दर्शन बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिवाय 20 मार्चला असलेले एकादशीचे कीर्तन व 25 मार्च रोजी असणारी गुढीपाडवा यात्रा रद्द
करण्यात आली आहे. 

आज सकाळपासून गर्दीचा ओघ कमीच होता. दुपारी एक ते चार या वेळात तर रस्ते, वाहनतळ, दर्शनरांग व मंदीर परीसरात भाविकांचा शुकशुकाट होता. पुजासाहित्य, तेलविक्री, भोजनालय व प्रसादविक्री तीन दिवसापासून थंडच आहे. दर्शन बंदच्या निर्णयानंतर सुरक्षा विभागाने लगेचच मंदीराकडे जाणारे सर्व रस्त्यावर लोखंडी सरंक्षण कठडे टाकले आहेत.

शिर्डी येथील साईसंस्थाननेही बाबांचे दर्शन बंद केले आहे. केवळ अॉनलाईन दर्शन दिले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना मंदिर बंद ठेवण्याचे आवाहन केलं होतं. त्या पार्श्वभूमीव जिल्ह्यातील देवस्थानांनी स्वतःहून हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

SCROLL FOR NEXT