बेळगाव - तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पहिली ते पाचवीचे विद्यार्थी शाळेत परतणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्यबाबत शाळांनी व शिक्षकांनी अधिक काळजी घ्यावी असे मत पालकांमधून व्यक्त होत असल्याने पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू झाल्यानंतर शिक्षकांना पालकांची भूमिका बजावावी लागणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर शाळा सुरू करण्याची मागणी वाढली होती त्याची दखल घेत येत्या सोमवारपासून पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे अनेक महिन्यानंतर लहान मुलांचा किलबिलाट शाळांमध्ये ऐकावयास मिळणार आहेत. मात्र अजूनही पालकांमध्ये आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत भिती असल्याचे दिसून येत असून शाळा सुरू केल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच सामाजिक अंतर, थर्मल स्क्रिनिंग व निर्जंतुकीकरण करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. शाळा परिसर आणि वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी सातत्याने मास्कचा वापर करावा, तसेच शिक्षकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असावेत असे मत पालकांमधून व्यक्त होत आहे.
पुरणाच्या भीतीमुळे पालकांनी आपल्या मुलांची अधिक काळजी घेतली आहे त्याचप्रमाणे शाळेत देखील काळजी घेतली जावी अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त होऊ लागली असून शाळा सुरू झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होणार नाही यासाठी शाळांमध्ये कोरूना नियमावलीचे पालन होणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया
शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे असून कोरोना काळात सर्रास पालकांनी आपल्या मुलांची विशेष काळजी घेतली आहे. त्याच प्रकारे शाळेत देखील काळजी घेतली जावी. अशी अपेक्षा आहे.
- बंडू बामणे, पालक
शाळा सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र शाळा सुरू करताना आवश्यक त्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. लहान मुले ऐकत नसतात त्यामुळे त्यांच्याकडे शिक्षकांनी अधिक लक्ष द्यावे.
- कमलेश लोहार, पालक
विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांचे संमती पत्र सक्तीचे असणार असून अनेक शाळांनी याबाबत पालकांना माहिती दिली असून सुरवातीला पहिल्या आठवड्यात अर्धा दिवस शाळा असनार आहे. तर त्यांनतर पूर्ण वेळ शाळा भरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.