ZP-Satara
ZP-Satara 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा परिषद देणार शेतकऱ्यांना मत्स्यबीज

सकाळवृत्तसेवा

सातारा - जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रथमच शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायासाठी प्रोत्साहन देणारी योजना अंमलात आणली आहे. जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांना मत्स्यबीज देण्यासाठी ७१ हजार रुपयांची या वर्षासाठी सेस फंडातून तरतूद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी मस्त्य व्यवसाय हा अर्थार्जनासाठी पूरक ठरत आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यास मदत होत असल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, कृषी सभापती मनोज पवार यांनी शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सेस फंडातून ७१ हजार रुपये निधीची तरतूद चालू आर्थिक वर्षासाठी केली आहे. प्रत्येक तालुक्‍यातील दहा शेतकऱ्यांना एक हजार मत्स्यबीजासाठी १०० टक्‍के अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी पंचायत समित्यांमार्फत प्रस्ताव मागविले जातील. त्यातून कृषी समिती लाभार्थ्यांची निवड करेल, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी विनायक पवार यांनी दिली. शासकीय योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला शेतकरी त्यासाठी पात्र ठरणार आहे. त्याने शेततळ्यास प्लॅस्टिक पेपरचे अस्तरीकरण केलेले असणे बंधनकारक आहे.

मत्स्यबीज खरेदी केल्यानंतर त्याचे बिल पंचायत समितीत सादर करावे लागेल. मत्स्यबीज खरेदीची खातरमजा झाल्यानंतर लाभार्थ्यांना अनुदान दिले जाईल, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT