Five charged for hunting two gaur 
पश्चिम महाराष्ट्र

एकाच कुटुंबातील पाचजणांनी दोन गव्यांची केली शिकार, वाचा....

सकाळ वृत्तसेवा

बाजारभोगाव (जि. कोल्हापूर) ः कातळेवाडी (ता. शाहूवाडी) येथे दोन गव्यांना विजेचा शॉक देऊन मारल्याचा प्रकार पुढे आला आहे. दोन्ही माद्या आहेत. या प्रकरणी एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. कळे न्यायालयाने आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या सुनावणीत या पाच जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तथापि, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना जामीन मंजूर केला.
 
कातळेवाडी येथील शेतकऱ्यांनी 17 एप्रिलला मालकीच्या रानशेताभोवतीच्या तारांच्या कुंपणामध्ये वीज प्रवाह सोडून दोन्ही गव्यांना ठार केले होते. पैकी एका गव्याचे रानातच खड्डा काढून दफन केले होते. दुसऱ्या गव्याला रानाशेजारच्या ओढ्यात ढकलले होते. सोमवारी (ता. 20) हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पेंडाखळेचे वनक्षेत्रपाल रवी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पांडुरंग दगडू उगवे, निवास दगडू उगवे, आनंदा दगडू उगवे, प्रदीप पांडुरंग उगवे व गणेश भागोजी उगवे (सर्व रा. कातळेवाडी, ता. शाहूवाडी) या एकाच कुटुंबातील पाच संशयितांना ताब्यात घेतले.

ओढ्यात ढकललेल्या आणि पुरलेल्या अशा दोन्ही गव्यांना बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रानभरे यांनी जागेवरच विच्छेदन केले. त्यानंतर पुन्हा दफन करण्यात आले. 

संशयितांना आज कळे पोलिस ठाण्यात आणले. तेथून कळे न्यायालयाने त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली. वन विभागातर्फे सरकारी वकील ऍड. वर्षा माने-खोत यांनी बाजू मांडली. न्यायाधीश विनोद खुळपे यांनी पाच जणांना पाच मेपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली; पण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जामीन मंजूर केला. 

कारवाईत उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक सुनील निकम, वनक्षेत्रपाल सूर्यवंशी, वनपाल राजेंद्र रसाळ, वनरक्षक अतुल कदम, भारत खुटाले, स्वप्नाली जाधव, संजय पाटील यांच्यासह वनमजुरांनी भाग घेतला. 

सरपंचांचे कुटुंबीयच 
कातळेवाडीचे सरपंच सागर उगवे यांचे वडील पांडुरंग, भाऊ प्रदीप, चुलते निवास व आनंदा, चुलतभाऊ गणेश या सर्वांनी गव्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. जबाबदार पदावरील व्यक्तीच्या कुटुंबीयांकडूनच ही आगळीक घडल्याने परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. 

गुन्हा नोंदविण्यास विलंब ! 
गव्यांना शॉक देऊन मारल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. त्याच दिवशी पंचनामा करण्यात आला. मात्र, गुन्हा काल (ता. 21) नोंदविण्यात आला. या विलंबामागचे गौडबंगाल काय, असा सवाल कातळेवाडी, माळापुडे परिसरातून विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी जाहीर होणार

मोठी बातमी! शिक्षकांना दोन वर्षांत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावीच लागणार; शालेय शिक्षण विभागाने मागितली माहिती; शिक्षणाधिकाऱ्यांचे मुख्याध्यापकांना आदेश

Panchang 20 January 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

हिवाळ्यात आरोग्य निरोगी ठेवायचंय? मग आळीव लाडूंची ही खास रेसिपी लगेच नोट करा

आजचे राशिभविष्य - 20 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT