1Corona_Danger_19.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

रुग्ण वाहतूक परवान्याच्या गैरवापराबद्दल पाच जणांवर गुन्हा 

सकाळवृत्तसेवा

शिराळा (सांगली) : संचारबंदी काळात जिल्हाबंदी असताना रुग्णासाठी दिलेल्या वाहतूक परवान्याचा गैरवापर केल्याप्रकरणी प्रदीप सदाशिव पाटील, गणपती पांडुरंग भालेकर (रा. निगडी) यांच्यासह पाच जणांवर शिराळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी असताना 16 रोजी शिराळा येथून प्रदीप सदाशिव पाटील याने त्यांची चुलती मालन पाटील यांच्यावर कॅन्सरचे उपचार करण्यासाठी सांगली पोलिस अधीक्षकांकडून शिराळा ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी ऑनलाईन पास मिळवला होता. हा परवाना फक्त रुग्ण पोचवण्यासाठी होता. त्यानुसार प्रदीप पाटील, गणपती पांडुरंग भालेकर, चालक संतोष संजय साळुंखे (रा. निगडी) यांनी त्यांच्या ताब्यातील गाडी (एमएच 10, सीएन 8787) मधून रुग्ण मालन पाटील यांना मुंबई येथील दवाखान्यात सोडले. मात्र, परत माघारी गावी येत असताना मुंबई येथून निगडी येथे दोन व्यक्तींना घेऊन आले. या दोन्ही व्यक्तींना गुरुवारी (ता. 23) त्रास होत असल्याने मिरज येथे ऍडमिट करण्यात आले होते. त्यातील एका व्यक्तीस कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे गणपती पाडुरंग भालेकर, संतोष संजय साळुंखे, प्रदीप सदाशिव पाटील, रामचंद्र गणपती भालेकर यांच्यासह कोरोना रुग्णावर शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Muncipal Election: शिवसेना विरुद्ध शिवसेना! ठाकरेंचे शिलेदार शिंदेंच्या माजी नगरसेवकांशी भिडणार

Chikhaldara News : मेळघाटमध्ये आठ महिन्यात १०७ बालमृत्यू; चार माता मृत्यू

पर्वताची राणी 'मसूरी' आणि शांत 'लंढौर', हिवाळ्यात २ दिवसांच्या बजेट ट्रिपचा संपूर्ण आराखडा

Latest Marathi News Live Update : बीड जिल्ह्यातील माजलगावच्या दत्तनगर शाळेतील मुलांनी अडवला जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता

Shreyas Iyer चं कमबॅक होणार, तेही कर्णधार म्हणून; दोन सामन्यांत करणार नेतृत्व

SCROLL FOR NEXT