NSUI.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे सांगलीत पाचशे जणांना जेवण 

सकाळवृत्तसेवा

सांगली-युवा नेते, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांच्यावतीने संचारबंदी काळात गरीबांसाठी मोफत जेवण पार्सल वितरणास आज प्रारंभ झाला. विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे आज पहिल्या दिवशी पाचशे लोकांना घरपोहोच जेवण देण्यात आले. "लॉक डाऊन' संपेपर्यंत गरीबांना जेवण पुरवले जाईल असे विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील यांनी सांगितले. 


राज्यमंत्री डॉ. कदम यांनी "लॉक डाऊन' काळात सांगलीतील गरीब, बेघर आणि परप्रांतिय कामगार, परगावचे विद्यार्थी यांना मोफत घरपोहोच जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी कॉंग्रेसच्या सदस्यांमार्फत हे जेवण पुरवले जाणार आहे. तसेच संचारबंदी काळात लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थी कॉंग्रेसने हेल्पलाईन सुरू केली आहे. जेवण वाटपाच्या उपक्रमास आज प्रारंभ झाला. 


जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, ""संपूर्ण जगात "कोरोना' ने हाहाकार माजला आहे. देशात रुग्ण आहेत. महाराष्ट्रात देखील "कोरोना' बाधित रूग्णांची संख्या दोनशे पार झाली आहे. जिल्ह्यात देखील 25 कोरोना बाधित रूग्ण आहेत. "कोरोनो'चा उद्रेक वाढत असल्याने देशात "लॉक डाऊन' केला आहे. त्यामुळे शहरात असलेले परप्रांतीय कामगार, विद्यार्थी, गरीब लोक यांची जेवणाची गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना जेवणाची सोय करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सांगलीत आज पहिल्या दिवशी 500 लोकांना जेवण घरपोच करण्यात आले. 14 एप्रिलपर्यंत हा उपक्रम राहील.'' 
दरम्यान जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील, विश्वजीत युथ फाऊंडेशनचे उदय शिंदे, शहर अध्यक्ष सौरभ साळुंखे, उपाध्यक्ष ओंकार पाटील आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

Kolhapur Crime News : वंशाला दिवा पाहिजे म्हणून, कोल्हापुरात महिलेसोबत घडलं भयानक; नणंद, सासूने केलं धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Pune News: इंदापुरात २९ गायी-वासरांची सुटका; तीन वासरांचा गुदमरून मृत्यू, दोघांविरुद्ध गुन्हा, धक्कादायक चित्र समोर!

SCROLL FOR NEXT