Five million students will still get nutritional support from school closures 
पश्चिम महाराष्ट्र

शाळा बंद तरीही पाच लाख विद्यार्थ्यांना मिळणार पोषणआहार

दौलत झावरे

नगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा- महाविद्यालयांना सुटी दिली; परंतु विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषणआहाराचे धान्य खराब होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हे धान्य विद्यार्थ्यांना वाटण्याचा आदेश प्राथमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी दिला आहे. मात्र, शहरी भागातील 84 शाळांसाठी हा आदेश लागू नाही. 

कोरोनामुळे जिल्ह्यातील 4534 शाळा बंद झाल्या. त्यांत चार लाख 70 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शालेय पोषणआहारासाठी आलेल्या धान्याचे वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना मार्चच्या सुरवातीलाच शालेय पोषणआहारासाठी धान्यपुरवठा झाला. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात 14 एप्रिलपर्यंत "लॉक डाउन' करण्यात आले. त्यामुळे पोषणआहारातील तांदूळ, डाळ, कडधान्य खराब होण्याची शक्‍यता असल्याने, त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्याची सूचना दिली आहे.

सर्व विद्यार्थ्यांना सम प्रमाणात धान्यवाटप करण्याचे सूचित केले आहे. हे वाटप करताना शाळेत विद्यार्थी व पालकांची गर्दी होणार नाही, याचे नियोजन करायचे आहे. याबाबत जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाला माहिती देण्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 4450 शाळांतील सुमारे पावणेपाच लाख विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप केले जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT