पश्चिम महाराष्ट्र

पूरग्रस्तांसाठी प्रती कुटुंब पाच लिटर मोफत रॉकेल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रती कुटुंब पाच लिटर रॉकेल मोफत देण्यात येणार आहे. यासाठी एकूण 34 टँकर वितरणास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंजुरी दिली आहे.

घाऊक रॉकेल वितरकांनी दिलेल्या रॉकेल कोट्याची तात्काळ उचल करावी व किरकोळ रॉकेल वितरकांस रॉकेल तात्काळ उपलब्ध करून द्यावे. दिरंगाई झाल्यास नैसर्गिक आपत्ती अधिनियम 2005 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

तालुकानिहाय रॉकेल मंजूर टँकरची संख्या आणि घाऊक वितरक असे - 

कागल आणि राधानगरी -शेतीमाल प्रकिया संघ -1 टँकर,

गडहिंग्लज, आजरा, चंदगड, गगनबावडा आणि करवीर- काळभैरव एजन्सीज-1 टँकर,

भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा आणि करवीर- काळभैरव एजन्सीज-1 टँकर,

शिरोळ - शेतकरी सहकारी संघ - 5 टँकर, जनता कंझ्युमर्स -5 टँकर, सर्वोदय विकास सेवा सोसायटी- 5 टँकर, ए.जी. जाजल-1 टँकर असे एकूण 16 टँकर,

हातकणंगले, इचलकरंजी - कोंडूसकर ब्रदर्स - 3 टँकर, बी.जे.शेठ - 3 टँकर, ए.जी. जाजल-1 टँकर असे एकूण 7 टँकर,

करवीर, कोल्हापूर शहर भारत एजन्सी - 5 टँकर, कागल तालुका खरेदी विक्री संघ-3 टँकर असे एकूण 8 टँकर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT