पश्चिम महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी पाच ठिकाणी केअर सेंटरची स्थापना

सकाळ वृत्तसेवा

सातारा : राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून, जिल्ह्यातही काही दिवसांपासून संशयित रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पाच ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत.
 
जिल्ह्यात कोरोना केअर सेंटरची स्थापना करण्यात आली असून, या सेंटरमध्ये संशयित कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व गावांत रुग्णांची माहिती घेण्यात येत आहे. या रुग्णांमध्ये आयएलआय (सर्दी, ताप, खोकला सदृश्‍य लक्षणे) व सारी (तीव्र सर्दी, ताप, खोकला असणारे रुग्ण ज्यांना दवाखान्यात दाखल करण्याची आवश्‍यकता आहे) याबाबत रुग्णांची माहिती घेण्यात येत आहे. यातील ज्या रुग्णांमध्ये सारीची लक्षणे आढळून आली आहेत. अशा रुग्णांच्या कोरोनाच्या तपासणीकरिता कोरोना केअर सेंटर स्थापना करण्यात आली आहेत. येथे अशा रुग्णांची तपासणी होणार आहे. याकरिता सामान्य रुग्णालय सातारा (सातारा व जावळी), उपजिल्हा रुग्णालय कऱ्हाड (कऱ्हाड व पाटण), ग्रामीण रुग्णालय वाई (वाई, खंडाळा व महाबळेश्वर), ग्रामीण रुग्णालय कोरेगाव (कोरेगाव व खटाव) व उपजिल्हा रुग्णालय फलटण (फलटण, माण) येथे कोरोना केअर सेंटर आहेत. या ठिकाणी संबंधित रुग्णांच्या घाशातील स्त्रावांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुढे पाठविले जाणार आहेत.
 
कोरोना संसर्गाचे गांभीर्य ओळखून होम क्वारंटाइनमध्ये राहावे, तसेच सर्दी, ताप, खोकला झाल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करून आरोग्य तपासणी करून घ्यावी. जेणेकरून त्यावर त्वरित उपचार करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी संजय भागवत यांनी सांगितले. 

Lockdown : डॉक्‍टर... पेट्रोलसाठी औषधांची चिठ्ठी द्या..!

श्री ब्रह्मचैतन्य महाराज संस्थानचे अखंड मदत कार्य सुरुच; ससूनला पंचवीस लाखांचा निधी
 

साहित्याची कमतरता नाही 

जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना, रुग्ण तपासणीकरिता डॉक्‍टरांना फेस शिल्ड, पीपीई किट, एन 95 मास्क, ट्रिपल लेअर मास्क व सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात वाटप केले आहे. या साहित्यांची जिल्ह्यात कमतरता होणार नाही, याची जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता घेण्यात येत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईचा विकास रखडला? बीएमसी बजेटपैकी ४८% निधी अजूनही प्रलंबित, खर्चाचे आकडे समोर

Viral Video: धक्कादायक! आईनं १०व्या मजल्याच्या बाल्कनीतून मुलाला लटकवलं; वेगळंच कारण समोर, पाहा व्हायरल व्हिडिओ

Mumbai: रस्ते आणि पुलांना नवी ओळख मिळणार! मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलणार; पण कोणत्या? जाणून घ्या यादी...

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

Dhule News : दोंडाईचा पोलिसांची मोठी कामगिरी! वर्णेश्वर महादेव मंदिरातील चोरीचा २४ तासांत छडा

SCROLL FOR NEXT