1Corona_Danger_19 
पश्चिम महाराष्ट्र

शिराळा तालुक्‍यात पाच नवे रुग्ण; वांगी, कुंडलमध्ये प्रत्येकी एक; रुग्णसंख्या 189; 9 चिंताजनक 

सकाळवृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात आज आणखी सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात शिराळा तालुक्‍यातील मांगले येथे आणि मणदुर येथे चार रुग्ण सापडले आहेत. तर वांगी (कडेगाव) आणि कुंडल (पलूस) येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळून आले आहेत. रुग्णांची संख्या 189 झाली असून सध्यस्थितीत 78 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नऊ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यावर मिरजेतील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 
 

शिराळ्यात रुग्णांचे अर्धशतक 
शिराळा :
शिराळा तालुक्‍यातील मांगले येथील डॉक्‍टरच्या संपर्कातील त्यांच्या 11 वर्षीय पुतण्याचा व मणदूर येथील चौघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्‍यात आज पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले असून तालुक्‍याची अर्धशतकाकडे वाटचाल झाली आहे. 

मांगले येथे 3 तर मणदूर येथे 24 रुग्ण झाले आहेत. त्यामुळे शिराळा तालुक्‍यातील रुग्णाची संख्या 49 तर पश्‍चिम भागातील रुग्णांची संख्या 38 झाली आहे. मांगले येथील खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्‍टरांना कोरोनाची लागण झाली होती.त्यामुळे त्यांच्या संपर्कातील त्यांचा भाऊ व पुतण्या यांना ही कोरोनाची लागण झाली आहे. तर मणदूर येथील 17 वर्षीय युवक, 16 वर्षीय युवती, 38 व 40 वर्षीय युवक अशा एकूण चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तालुक्‍यात निगडी 4 , रेड 3 , अंत्री खुर्द 1 , मोहरे 2 , खिरवडे 2, करुंगली 1 , चिंचोली 1 , मणदूर 24 काळोखेवाडी 2, रिळे 4,माळेवाडी1,मांगले 3 ,किनरेवाडी 1असे एकूण 49 रुग्ण झाले आहेत.  निगडी 3,रेड3,चिंचोली 1,करुंगली 1, मोहरे 1,मणदूर 1, खिरवडे 1 असे 11 कोरोना मुक्त झाले आहेत. 


वांगीत एकास लागण 
वांगी :
वांगी (ता.कडेगांव) येथे 69 वर्षे वयाची व्यक्ती कोरोना पॉंझिटीव्ह आली आहे. सदर व्यक्तीला आठ दिवसांपासून वारंवार ताप येत होता. याची माहिती परवा आशा सेविकांनी सांगितल्यानंतर दक्षता कमिटीने त्यास कडेगांवला रुग्णालयात पाठविण्याची सूचना केली होती. त्याठिकाणी स्वॅब घेतल्यावर तो पॉझिटीव्ह आला. पत्नीसह रुग्णास मिरज येथील कोव्हिड रुग्णालयात दाखल केले आहे. प्रशासनाने तातडीने गावाला जोडणारे सर्व रस्ते तात्काळ बंद केले आहेत. 


नऊ चिंताजनक 
साळसिंगे (खानापूर) येथील 60 वर्षीय व्यक्ती, कडेबिसरीतील 48 वर्षीय व्यक्ती, खिरवडे (ता. शिराळा) येथील 56 वर्षीय पुरुष, मणदूर (शिराळा) येथील 81 वर्षीय व्यक्ती, कदमवाडी (कवठेमहांकाळ) येथील 50 वर्षीय महिला, विटा (हनुमंतनगर) येथील 34 वर्षीय पुरूष, किनरेवाडी येथील 35 वर्षीय पुरूष, विहापूर (कडेगाव) येथील 82 वर्षीय पुरूष, वांगी (कडेगाव) येथील 69 वर्षीय पुरूष अशा नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी सातजण व्हेन्टिलेंटरवर आहेत. 

  •  नवे बाधित - 7 
  •  एकूण रुग्ण - 189 
  •  उपचार घेणारे रुग्ण - 78 
  •  बरे झालेले रुग्ण - 104 
  •  मृत्यू - 7 
  •  पॉझिटिव्ह चिंताजनक - 9 
  •  ग्रामीणमधील बाधित - 137 
  •  शहरी भागातील बाधित - 41 
  •  महापालिका क्षेत्र - 11

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT