पश्चिम महाराष्ट्र

रब्बीसाठी पाच टक्के पीक कर्जवाटप 

सकाळवृत्तसेवा

काशीळ - सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृतसह सहकारी बॅंकांनी ऑक्‍टोबरअखेर केवळ पाच टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात "आयडीबीआय'ने सर्वाधिक 12 कोटी 33 लाखांचे म्हणजे उद्दिष्टाच्या 25 टक्के कर्जाचे वितरण केले आहे. 

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 1012.88 कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ऑक्‍टोबर महिनाअखेर 51 कोटी 83 लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. रब्बी हंगामात पीककर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आघाडी घेतली आहे. या बॅंकांचे 377.28 कोटी उद्दिष्ट असून, यापैकी 36 कोटी 47 लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी दहा टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांत आयडीबीआय या बॅंकेने सर्वाधिक 12 कोटी 33 लाखांचे म्हणजेच उद्दिष्टाच्या 25 टक्के कर्जाचे वितरण केले आहे. त्यानंतर स्टेट बॅंक ऑफ इंडियाने दहा कोटी 74 लाख कर्ज वितरण केले आहे. खासगी बॅंकांनी एकूण उद्दिष्टापैकी सहा टक्के कर्जवाटप केले आहे. खासगी बॅंकांमध्ये आयसीआयसीआय या बॅंकेने तीन कोटी 23 लाख कर्ज वितरण केले आहे. सहकारी बॅंकांत सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने नऊ कोटी नऊ लाख रुपये कर्जाचे वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने एकूण उद्दिष्टापैकी दोन टक्के कर्जाचे वितरण केले आहे. रब्बी कर्ज वितरण सुरू होऊन एक महिना उलटला असून, कर्ज वितरण करण्याची मार्चअखेरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे बहुतांशी बॅंका अखेरच्या टप्प्यात कर्जाची उद्दिष्टे पूर्ण करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रब्बी हंगाम हा माण, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा या दुष्काळी तालुक्‍यांचा प्रमुख हंगाम असल्याने या तालुक्‍यात रब्बी कर्ज जास्त प्रमाणात वितरण केले जाणार आहे. 

खरिपात 83 टक्के कर्ज वितरण  
जिल्ह्यात खरिप हंगामात 1519.31 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात 1259.83 कोटी कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. म्हणजेच एकूणच उद्दिष्टाच्या 83 टक्के कर्जाचे वितरण झाले आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी उद्दिष्टाच्या 105 टक्के, तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने 75 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT