maharashtra day.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनी केवळ येथेच ध्वजवंदन होणार 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमिवर महाराष्ट्र दिनी फक्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन होणार आहे. अन्य सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षण संस्था, सहकारी संस्थांसह सर्वच खासगी, सरकारी कार्यालयात ध्वजवंदन करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज केले आहे. 
राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्धापनदिनी शुक्रवारी ( ता. 1 मे ) जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजवंदन होईल. यावेळी प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित असतील. ध्वजवंदन करताना शारिरीक अंतर राखले जाईल. जिल्ह्यातील सर्व 73 प्रकारच्या शासकीय कार्यालयात ध्वजवंदन करु नये असे आवाहन केले आहे. प्रमुख अधिकाऱ्यांशिवाय अन्य अधिकारी वगळता कर्मचाऱ्यांनी ध्वजवंदनास उपस्थित राहू नये, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

 
"कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनावर यंदा सावट आले आहे. प्रतिवर्षी महाराष्ट्र दिन उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. परंतू यंदा केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजवंदन केले जाईल. गर्दी टाळण्यासाठी म्हणून अन्य ठिकाणच्या ध्वजवंदन कार्यक्रमास प्रशासनाने मनाई केली. या सूचनेचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

माजी सरन्यायाधीश राज्यसभेतून निवृत्त, ६ वर्षात एकही प्रश्न विचारला नाही, चर्चेत एकदाच सहभाग त्यातही वादग्रस्त विधान

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar News: बारवेलगत अतिक्रमणाचा डाव उधळला; महापालिकेची कारवाई; समर्थनगरमध्ये पत्र्याचे शेड हटविले

Sambhajinagar Hospital News: घाटीवरील ताण कमी होणार; १८९ कोटींचे माता-बाल रुग्णालय लवकरच सुरू; दूध डेअरी परिसरात अत्याधुनिक महिला रुग्णालय

SCROLL FOR NEXT