solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

उड्डाण कृत्रिम पावसासाठी; वर्षाव पालिकेच्या तिजोरीत

विजयकुमार सोनवणे

सोलापूर - गेल्या दीड महिनाभरात दिवसातून दोन वेळेला आकाशात भिरभीरणाऱ्या विमानांना पाहून सोलापूरचे विमानतळ सुरु झाले की काय, असा भ्रम शहरवासियांचा झाला होता. मात्र ही उड्डाणे होती कृत्रिम पावसाच्या अभ्यासासाठी, कृत्रिम पाऊस पडला की नाही याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र पालिकेच्या तिजोरीत मात्र तब्बल 1.80 लाखांच्या उत्पन्नरूपी "गारा' पडल्या.

सोलापूर शहरात कृत्रिम पाऊस पडण्यासाठी ढगांतून विमाने फिरवण्यात आली. त्यासाठी सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळेला विमाने फिरवण्यात आली. उड्डाणावेळी अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाचे वाहन तैनात ठेवावे लागते. त्यासाठी प्रतीफेरी अग्निशमन शुल्क एक हजार आणि आरोग्य विभाग वाहनासाठी एक हजार असे शुल्क आकारले जाते. कृत्रिम विमानासाठी 45 दिवस रोज दोन वेळेला उड्डाण करण्यात आले. प्रत्येक उड्डाणाच्या काहीवेळ आदी ही वाहने विमानतळावर सज्ज असत. त्यापोटी हे उत्पन्न महापालिकेस मिळाले आहे. 

विमानतळावर सुरक्षेसाठी फोमची सुविधा असलेले वाहन लागते. अचानकपणे एखादी दुर्घटना झाली तर तातडीने कार्यवाही करता येईल यादृष्टीने वाहन सज्ज ठेवावे लागते. वाहनावर फायरमनही तयारीत असतात. आरोग्यविभागाच्या वाहनामध्येही तज्ज्ञ डॉक्‍टर, विमानात बसलेलेल्या व्यक्तींच्या "रक्तगटा'च्या बाटल्या, कोणत्याही आरोग्यविषयक समस्याला सामोरे जाता येईल, तातडीने उपचार करता येईल यानुसार अतिदक्षता उपचार पथक सज्ज ठेवलेले असते. सुदैवाने या 45 दिवसांत एकही दुर्घटना झाली नाही. मात्र सुरक्षा आणि व्यवस्थेपोटी महापालिकेच्या तिजोरीत 1.80 लाखांचा भरणा मात्र झाला. 

विमान येणार आहे म्हटल्यावर त्याचा पहिला निरोप आम्हाला येतो. विमान उतरण्याची आणि उड्डाणाची वेळ सांगितली जाते. त्यानुसार आम्ही वाहनाची व्यवस्था करतो. खास विमानतळासी आवश्‍यक असलेले "फोम टेंडर' दलाकडे उपलब्ध आहे. हेच वाहन आम्ही बंदोबस्तासाठी पाठवतो. 
- केदार आवटे, अधीक्षक महापालिका अग्निशमन दल 

एकूण दिवस - 45 
रोजची उड्डाणे - 02 
एकूण उड्डा णे - 90 
प्रती उड्डाण शुल्क - 2 हजार रुपये 
मिळालेले उत्पन्न - 1.80 लाख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT