Deposit in the name of another in Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

भोंगळ कारभार.... सांगलीत महापुराचे अनुदान दुसऱ्याच्याच नावावर जमा 

सकाळवृत्तसेवा

सांगली : सांगलीत सहा महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरात झालेल्या नुकसानीचे अनुदान म्हणून एक लाख 31 हजार रुपयांची रक्कम दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर जमा झाल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेने रक्‍कम स्वीकारलेल्या खातेधारकाला नोटीस बजावून ही रक्कम 48 तासांत महापालिकेच्या खात्यात जमा करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

गेल्या ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्त झालेल्यांना घरांची पडझड व घरभाड्यापोटी अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. महापालिकेच्या पथकाने नुकसानीचा सर्व्हे करून लाभार्थ्यांची नावे निश्‍चित केली. त्यांच्या खात्यावर भरपाई व अनुदानाची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले.

यामध्ये खणभागातील वैजंता नामदेव चौगुले यांच्या घराचेही नुकसान झाले होते. त्यांच्या घराचा सर्वेही झाला. त्यामध्ये त्यांना नुकसान भरपाई मिळणार असे वाटले. त्यानुसार चौगुले यांच्या खात्यावर घरभाड्याचे अनुदान 36 हजार व पडझड नुकसानीपोटी 95 हजार रुपये असे एक लाख 31 हजार रुपये जमा होणार होते. मात्र ते झाले नाहीत. पण, महापालिकेच्या दप्तरीमात्र ही रक्कम अदा केल्याचे दिसत होते. 

या प्रकाराची तपासणी केली असता चौगुले यांना मिळणारी भरपाईची रक्कम खणभागातील अतुल नलगे यांच्या खात्यावर जमा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली. तातडीने सहाय्यक आयुक्तांनी नलगे यांना नोटीस बजावून येत्या 48 तासांत ही रक्कम महापालिकेकडे जमा करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

याबाबत नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले की, ऑक्‍टोबर 2019 मध्ये पूरग्रस्त नागरिकांच्या खात्यावर घरभाडे व पडझडीची रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर आता 29 जानेवारी 2020ला ही रक्कम आपल्या खात्यावर नजर चुकीने जमा झाल्याचे सांगत महापालिकेने नोटीस बजावली आहे. ही रक्कम पूरग्रस्त नागरिकाकडून खर्च झालेली आहे. त्यामुळे आता तो ती रक्कम कशी जमा करणार? या साऱ्या प्रकारातून महापालिकेचा भोंगळ कारभारच दिसून येतो, अशी टीका केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT