Rupees
Rupees Sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत पूरग्रस्तांसाठी 800 कोटींची गरज

विष्णू मोहिते

सांगली : सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे ८०० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. जिल्हा प्रशासनाने सानुग्रह अनुदान ३० कोटी रुपयांचे वाटप केले आहे. उर्वरीत शेतीसह घरे, झोपड्या, गोठे, बारा बलुतेदार कलाकार, शासकीय इमारतीस रस्ते नुकसानीसाठी ८०० कोटी रुपयांची गरज असून राज्य सरकारकडे निधीची मागणी केली आहे. मदतीसाठी विलंबाने राज्य सरकारच्या धोरणावर जनतेत नाराजीत भर पडते आहे.

जुलैमध्ये आलेल्या महापुरात घरे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पूरग्रस्तांना तत्काळ मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र सव्वा महिन्यांनंतरही मदत न मिळाल्याने नाराजी वाढली आहे. जिल्ह्यात पाच तालुक्यांतील २४७ गावांतील आतापर्यंत १ लाख ५६५ शेतकऱ्यांच्या ३९ हजार ६९५ हेक्टर जमिनींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यात जमिनीच्या भूस्खलनाच्या ५८१ हेक्टरमध्ये शिराळा तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ४४६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. तीन इंचापेक्षा जादा माती, गाळ साचलेल्या जमिनीचे क्षेत्र १४२ हेक्टर आहे. पूरग्रस्त ४२ हजार ३१९ कुटुंबांना दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू आणि पाच किलो तुरडाळीचे ९५ टक्के कुटुंबांना वाटप पूर्ण झाले आहे.

दृष्टिक्षेप -

  • चार तालुक्यांतील ११३ गावे बाधित

  • ७३ हजार ९६७ कुटंबांचे पंचनामे

  • पूर्णत: नष्ट झालेली कच्ची घरे ५२३ व पक्की घरे १७४

  • अंशत: नष्ट झालेली कच्ची घरे २९०० व पक्की घरे १३८४

  • १९ झोपड्या, १५०० गोठ्यांचेही नुकसान

  • १२१ लहान मोठी जनावरे व ४३ हजार ९४५ कुक्‍कुटपक्ष्यांचे पंचनामे

  • ९४५ हस्तकला, हातमाग, बाराबलुतेदार

  • १२ हजार ५८३ दुकानदार, ७ हजार २४२ टपरीधारक

  • ४३ कोंबडीपालन शेडचे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT