Floods in Bellary Nala thousands of acres of farmland under water 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावातील बळ्ळारी नाल्याला पूर ; हजारो एकर शेती पाण्याखाली

मिलिंद देसाई

बेळगाव : शहर आणि परीसरात पावसाचा जोर वाढल्याने बळ्ळारी नाल्याला पूर आला असुन हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच शिवारात पाणी वाढत असुन पिकांचे मोठ्‌या प्रमाणात नुकसान होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. बळ्ळारी नाल्याचे पाणी यरमाळ रोड, केएलई रुग्णालय, धामणे रोड, प्रस्तावित बायपास रोडपर्यंत येऊन पोहचले आहे. त्यामुळे नाल्याला आलेला पुर पाहण्यासाठी वडगाव आणि परिसरातील नागरीकांनी बुधवारी दुपारपासुन गर्दी केली होती. 


मान्सुनला सुरुवात झाल्यापासुन शहर आणि परिसरात पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे बळ्ळारी नाल्याला मोठ्‌या प्रमाणात पाणी आले नव्हते. त्यामुळे यावेळी भात पिक चांगल्या प्रकारे येईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातुन व्यक्‍त  केली जात होती.  रोप लागवडही योग्य वेळेत पार पडली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासुन अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे.  शहर आणि परिसरातुन बळ्ळारी नाल्यात मोठ्‌या प्रमाणात पाणी येते. आणि नाल्याला दरवर्षी पुर येत आहे. तसेच बळ्ळारी नाल्याला पुर आल्यानंतर शिवारात शिरलेले पाणी लवकर कमी होत नाही त्यामुळे भात पिक कुजुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

बळ्ळारी नाल्याचे पाणी यरमाळ रोड पासुन ते बायपाससाठी करण्यात आलेल्या सपाटीकरणापर्यंत पोहचले असुन पावसाचा जोर असाचा कायम राहिल्यास शिवारात अधिक प्रमाणात पाणी पसरण्याची भिती शेतकऱ्यांमधुन व्यक्‍त होत असुन दोन चार दिवसांपुर्वी ज्या शेतकऱ्यांनी रोप लागवड केली आहे. त्या शेतकऱ्यांना बळ्ळारी नाल्यातील पाण्याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. तसेच बुधवारी अनगोळ, वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, हलगा. बेळगाव, बसवन कुडची आदी भागातील भात पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असुन पावसाचा जोर कमी व्हावा अशी प्रार्थना शेतकऱ्यांमधुन होऊ लागली आहे. 

जलपर्णी न काढल्यामुळेच बळ्ळारी नाल्याला पुर येत असुन सध्या आलेल्या पुराचे पाणी लवकर ओसरले तर कमी प्रमाणात नुकसान होणार आहे. अन्यथा गेल्यावर्षी प्रमाणेच यावेळी भात पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. 
देवीदास चव्हाण पाटील, शेतकरी

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर परिते ग्रामस्थांचा सोमवारी न्याय मोर्चा

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

Titwala Train Accident : भयंकर दुर्घटना! ट्रेनच्या इंजिनमध्ये मृतदेहाचे तुकडे; मृत व्यक्तीचे अवयव बाहेर काढण्यासाठी कापला कॅटल गार्ड, लोकल सेवा खोळंबली

SCROLL FOR NEXT