पश्चिम महाराष्ट्र

कास पुष्प पठारावर फुलांचा गालीचा ; हंगामास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

कास ः अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कास पुष्प पठारावर रंगबिरंगी फुलांचा गालीचा तयार होण्यास प्रारंभ झालेला असून, कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने शनिवारपासून (ता. 31) हंगामाची अधिकृत सुरवात होणार आहे. 

हंगामात पर्यटकांना पठारावर जाण्यासाठी 100 रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे. पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय घाटाई फाट्यावर करण्यात आली असून, वाहने तेथेच ठेवून पठारावर समितीच्या बसने जावे लागणार आहे. त्यासाठी दहा रुपये शुल्क आकारले जाणार आहे. पर्यटकांना गाईड हवा असल्यास 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे, तसेच पठारावर "नो पार्किंग झोन' तयार करण्यात आला असून, पठारावर वाहन नेल्यास दंड आकारला जाणार आहे. फुलांची अथवा साधनांची नासधूस केल्यास उपद्रव शुल्क 500 ते एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. 

पर्यटकांसाठी अचानक पाऊस आल्यास किंवा विश्रांतीसाठी कास पठारावरील टोलनाका, तसेच राजमार्गावर शेड उभारण्यात आली आहेत. स्वच्छतागृहांची सोयही तेथेच करण्यात आली आहे. पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी, तसेच नियंत्रणासाठी 137 स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. पठारावर मोबाईल "रेंज' मिळत नसल्यामुळे, तसेच विस्तीर्ण पठारावर संपर्कासाठी कर्मचाऱ्यांकडे "वॉकीटॉकी'द्वारे संपर्क केला जाणार आहे. पठारावरील फुले पाहण्यासाठी सततच्या पावसाने वाटा शेवाळून निसरड्या होतात. त्यामुळे यावर्षी फुले पाहण्यासाठी पठारावर जांभ्या दगडातील पायावाटाही करण्यात आल्या आहेत. पठारावर फुलांची माहिती देणारे, तसेच घ्यावयाची काळजी याबाबतचे सूचना फलकही लावण्यात आले आहेत. 
पठारावर एकाद्या वेळी पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊन सर्व व्यवस्थेवर ताण येतो, तसेच फुलांचेही नुकसान होते, हे टाळण्यासाठी नियंत्रित पर्यटनाला चालना देण्यासाठी ऑनलाइिन बुकिंग www.kas.ind.in या साईटवर उपलब्ध केले असून, याद्वारे दिवसाला तीन हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. 

तसेच यावर्षी कास पठार परिसर दर्शन बससेवा ही विशेष बस सुरू करण्यात येणार आहे. घाटाई फाटा, कास तलाव, वजराई धबधबा, अंधारी, सह्याद्रीनगर, एकीव हा या बसचा मार्ग राहणार असून, येथील प्रसिद्ध ठिकाणे दाखवण्यात येणार आहेत. यासाठी प्रतिव्यक्ती 400 रुपये शुल्क असणार आहे, तसेच यावर्षी पर्यावरणपूरक पर्यटनासाठी कासच्या टोलनाक्‍यावर सायकली ठेवण्यात येणार असून, पठारावर फिरण्यासाठी एका तासासाठी 100 रुपये शुल्क आकारून ही सायकल देण्यात येणार आहे; परंतु त्यासाठी ओळखपत्र द्यावे लागणार आहे. 


पांढरे गेंद, निळी सितेची आसव... 

कासवर सद्यःस्थितीत पांढरे गेंद, किटकभक्षी निळी सितेची आसव, निळे जांभळे आमरीचे दोन तीन प्रकार, जांभळा तेरडा, पिवळी सोनकी, टूथब्रश, वायतुरा, रानहळद, निलिमा, अबोलिमा आदी फुलांच्या जाती दिसत असून, पठार पूर्णपणे अच्छादित होण्यासाठी अजून थोडे दिवस वाट पाहवी लागणार आहे. 


कास पठार कार्यकारी समिती व वनविभागाच्या वतीने कासच्या हंगामाची जय्यत तयारी केली असून, पर्यटकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल. हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाचीही मदत घेणार आहोत.

 बजरंग कदम, अध्यक्ष, कास कार्यकारी समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT