Follow the air for the second leg 
पश्चिम महाराष्ट्र

दुसऱ्या टप्यासाठी हवा पाठपुरावा 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : शाहू समाधी स्मारक झाले. महापालिकेने कोणत्याही मदतीशिवाय स्वनिधीतून पावणेतीन कोटी रुपये खर्चून हे काम गतीने केले. कामाचा पहिला टप्या तर पूर्ण झाला आता लवकरच दुसऱ्या टप्यालाही सुरवात होईल, अशी आशा करायला हरकत नाही पण त्याचबरोबर या शाहू समाधी स्थळाची देखभाल, संरक्षण व्यवस्था आणि दुसऱ्या टप्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी गट, तट राजकारण न पाहता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांनीही हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. 

सिध्दार्थनगर नर्सरी बाग येथील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक साकारले. 2013 ला या शाहू समाधीस्थळाचा विषय पुढे आला आणि तेथून पाठपुरावा झाल्यामुळे 2015 ला या कामाची सुरूवात मारली. अवघ्या चार, साडेचार वर्षात हे काम पूर्ण झाले. विशेष म्हणजे कोणताही सरकारी निधी नसताना केंद्र, राज्य सरकारकडून दमडीही न घेता, हे काम महापालिकेने स्वनिधीतून पूर्ण केले. 

काही वर्षात महापालिकेच्या हातून जी काही चांगली कामे झाली असतील त्यापैकी या कामाला अव्वलस्थान देण्याची गरज आहे. या समाधीस्थळाचे काम पाहिले तर या कामाने चांगला दर्जा प्राप्त केला आहे. दर्जेदार अशाप्रकारचे काम झाले आहे. त्यामुळे हे काम दीर्घकाळ कसे टिकेल. याकडे सर्वानी लक्ष देण्याची गरज आहे. 

आता हयगय नको 
शाहू समाधी स्मारकाच्या उदघाटनाच्या निमित्ताने दोन महत्वाच्या घोषणा झाल्या आहेत. पहिली घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि स्वत: दुसऱ्या टप्याचा पाच कोटींचा निधी कोणत्याही परिस्थितीत मंजूर करुन आणेन आणि 2022 पूर्वी या निधीतून कामेही पूर्ण होतील, अशी घोषणा त्यांनी केली. श्री. मुश्रीफ यांनीही तशी कबुली कार्यक्रमातच दिली आहे. खासदार संभाजीराजे यांनी शाहू समाधी स्मारकाबरोबरच शेजारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉलसाठी एक कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. हा दोन्ही निधी मिळविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही, याची काळजी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. तातडीने याचे प्रस्ताव कसे तयार होतील आणि ते खासदार आणि मंत्री तसेच मंत्रालयापर्यंत पोहचतील कसे? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापाचा वाद पोरावर राग! रिक्षातून ओढून धुणे धुतल्यासारखं ४ वर्षीय मुलाला मारहाण, मुंबईतील अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ...

मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रॉडकास्ट इंजिनियरचा मृत्यू; हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

Satara News: सातारा जिल्हा रुग्णालयात चक्क मृतदेहाची अदलाबदल; नातेवाईकांचा संताप अनावर, महिन्याभरात दुसरी घटना, नेमकं काय घडलं!

Fridge Safety Tips : फ्रीजचा ब्लास्ट! उन्हाळ्यात अजिबात करू नका 'या' 4 चुका; नाहीतर बॉम्बसारखा फुटेल रेफ्रिजरेटर

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT