Follow Chaturmas; But follow these rules; This meeting has made an appeal 
पश्चिम महाराष्ट्र

चातुर्मास पाळा; पण हे नियम पाळा; यांनी केले आहे आवाहन

सकाळवृत्तसेवा

सांगली : यंदाचा चातुर्मास उद्या (ता. 28) रविवारपासून सुरु होत आहे. धर्मसाधनेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा कालावधी असतो. परंतू कोरोनाच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे सरकारने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन सर्व नियम पाळून या चातुर्मासातील सर्व धार्मिक उपासना, कार्यक्रम घरच्या घरी स्थानिक पंडितांच्या मार्गदर्शनानुसार करावेत असे आवाहन दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले आहे. 

रावसाहेब पाटील म्हणाले, जैन धर्मात चातुर्मासाला मोठे धार्मिक महत्व आहे. या काळात विविध पुजा विधाने, अष्टान्हिक पर्व, नोपी, पर्युषण पर्व, स्वाध्यायादी नियमित केले जातात. यासाठी मंदिरांच्या माध्यमातून लोक एकत्र येत असतात. परंतू, या वर्षी कोरोनामुळे अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे भगवान महावीर जयंतीही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने गर्दी टाळण्याचे केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन घरच्या घरी केली होती. तसेच चातुर्मास काळातही मंदीर दर्शन किंवा अभिषेक आदीसाठी आग्रह न धरता शासनाच्या नियमांचे पालन करत आत्मसाधना करावी. घरीही सर्व नियमांचे पालन करत दिनचर्या करावी असे आवाहन रावसाहेब पाटील यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Hinjawadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो ३ नोव्हेंबर पासून रुळावर; मोदी करणार ऑनलाइन उद्घाटन

IND vs NZ 3rd T20I : वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या सामन्यातून वगळा, इशान किशन दुखापतग्रस्त असला तरी... टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला

Gold Rate Today: ऑक्टोबरअखेरीस सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी तर 1.94 लाखांपर्यंत घसरली; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील दर पाहा

Nagpur News: रब्बीच्या पाणीप्रश्नावरून शेतकरी आक्रमक; गहू पिकासाठी १५ दिवसांची एक पाळी देण्याची मागणी

Bhandara Tiger Attack: वाघांच्या हल्ल्यात नवविवाहित तरुणाचा मृत्यू; सहा महिन्यांपूर्वीच विवाह, परिसरात दहशत

SCROLL FOR NEXT