Follow the instructions ... Jayant Patil's appeal 
पश्चिम महाराष्ट्र

भ्रमात राहू नका... जयंत पाटील यांचे आवाहन

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर : प्रचंड प्रगत देशात कोरोना व्हायरसमुळे हजारो बळी जात आहेत. त्यामुळे आपल्याला काही होणार नाही या भ्रमात राहू नका. पोलिसांना सहकार्य करून सरकारच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला केले आहे. 

जयंत पाटील यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवरून आज जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 दिवसांचे लॉकडाऊन का जाहीर केले, हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवे. कोरोनाचा संसर्ग असेल तर या दिवसात त्या व्यक्तीची लक्षणे समजणार आहेत. त्यामुळे या लॉकडाऊनची शिस्त पाळली पाहिजे. नाहीतर आपल्याला फार मोठे परिणाम भोगावे लागतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जयंत पाटील यांनी तिथली परिस्थितीही समोर मांडली. एकूण 23 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. शिवाय एक कोल्हापूरहून केस आली आहे, अशी 24 लोकांना ही लागण झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. हे संकट टाळायचे असेल त्याचा बिमोड करायचा असेल तर घरातच राहा. काही लोक रिलॅक्‍स होण्यासाठी बाहेर विनाकारण फिरत आहेत. मात्र पुढचे 14 दिवस आपल्यासाठी गंभीर आहेत. त्यामुळे प्रत्येकाने घरातच रहायला हवे. घराबाहेर पडायचे टाळा. कोरोना व्हायरस घालवण्यासाठी सर्व सूचनांचे पालन करा, असे आवाहन त्यांनी केले. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असताना राज्यभरातून अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना, काळजी घ्या, घराबाहेर पडू नका, अशा सूचनाही जयंत पाटील यांनी जनतेला दिल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामललाच्या दर्शनाची वेळ आणि नियम अचानक बदलले; आता VIP पास सुद्धा बंद, काय आहे कारण?

'मराठी सिनेमासाठी काय करतोय?' विलासराव देशमुखांनी रितेशला विचारलेला प्रश्न, वडिलांची इच्छा सांगताना म्हणाला...'सध्या मराठी भाषेला..'

Chakan News : काळ्या ऑइलवरील शेगड्यांकडे कल; चाकण परिसरामधील छोट्या हॉटेलचालकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT