Food and Drug Administration took action on the mutton shop in kolhapur marathi news  
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात मटणाच्या दुकानावरच का सुरु आहे छापेमारी...?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शाहूपुरी बेकर गल्लीतील राज मटण दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. तेथे विक्रीसाठी असलेले दीड किलो मटण जप्त करून त्याची विल्हेवाट लावली. तसेच दुकान बंद करण्याची नोटीस दुकानमालक राजू शेळके यांना दिल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागातील सहायक आयुक्त (अन्न) मो. शं. केंबळकर यांनी सांगितले. मटण जप्त करणे आणि दुकान बंद करण्याची नोटीस देण्याची घटना कोल्हापुरात पहिल्यांदाच घडली आहे.

दरम्यान, कारवाई होईल, या भीतीने शहरातील बहुतांशी मटण दुकाने बंद राहिली होती. कारवाईबाबत नेमकी कोणती भूमिका घ्यायची याबाबत रात्री मटण विक्रेत्यांची बैठक सुरू होती. यामध्ये अद्याप निर्णय झाला नसल्याचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी सांगितले.

निकष न पाळल्याने ‘अन्न औषध’ची कारवाई

मटण दुकानासाठी असलेले निकष पूर्ण न केल्यामुळे आज अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शाहूपुरी बेकर गल्लीतील राज मटण दुकानावर छापा टाकला. तेथे असुविधा आणि कायद्याचे निकष पाळले गेले नसल्यामुळे अन्नसुरक्षा अधिकारी शुभांगी कर्णे यांनी दुकानात असलेले दीड किलो मटण जप्त केले. त्यानंतर दुकान बंद करण्याची नोटीस दिली. जप्त केलेल्या मटणाची विल्हेवाट लावली. गेले महिनाभर मटणाच्या दरावरून कोल्हापुरात आंदोलने सुरू आहेत. त्यावर तोडगाही  निघाला होता, मात्र तरीही विक्रेते आणि कृती समितीचे आंदोलक यांच्याकडून वेगवेगळी भूमिका घेतली गेली. काल कृती समितीने केंबळकर यांना धारेवर धरून कारवाई करण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT