Force to have greenery in urban areas
Force to have greenery in urban areas 
पश्चिम महाराष्ट्र

शहरी भागात हिरवाईची सक्ती 

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड : शहरी भागात वाढणाऱ्या प्रदुषणाला आळा बसण्यासह त्या भागात हिरवाई यावी, यासाठी शासनाने महापालिकांसह पालिकांनाही वृक्ष लावण्याची सक्ती केली आहेे. पुणे विभागातील महापालिका, पालिका सुमारे आठ लाख एक हजार तीनशे वृक्षांची लागवड करणार आहेत. त्यासाठी शासनाने सक्ती केली आहे. सातारा जिल्ह्यातील पालिका, नगरपंचायतींनाही त्याबाबतचे आदेश आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही आगामी वर्षभरात सुमारे 20 हजार 350 वृक्षांची लागवड करण्याची सक्ती पालिकांवर केली आहे. त्या कामांचे शासन सोशल ऑडीटही करणार आहे. 

शासनाने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. वाढते प्रदुषण, होणारी बेसुमार वृक्षतोड व त्या कारणाने बदलते हवामान अशी अनेक कारणे सांगून शसानाने राज्यभरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. त्यात शहरी भागाचाही समावेशाचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागातील पालिका, महापालिकांना वृक्ष लागवड सक्तीची केली आहे. त्यासाठी सुमारे पन्नास कोटींच्या वृक्ष लागवडीची सक्ती केली आहे. त्यासाठी शासनाने काही नियमावली ठरवून दिली आहे. त्या कामाचे सोशल ऑडीटही शासन स्तरावर होणार आहे. त्यामुळे त्या कामाला महापालिका, पालिकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. 2019 मध्ये महापालिका, पालिका व नगरपंचायतींना आप आपल्या कार्यक्षेत्रात वृक्ष लागवड करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्याचे जिल्हानिहाय उद्दीष्ठही ठरवण्यात आले आहे.

शहरी भागात होणाऱ्या वृक्ष लागवडीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकांचे आयुक्त पालिका मुख्याधिकारी यांच्यावर सोपवली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी विभाग, जिल्हा व स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर नोडल ऑफीसर म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे. विभागीय स्तरावर प्रादेशिक उपसंचालक कार्यालयातील पालिका विभाग, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्याकडील जिल्हा प्रकल्प अधिकारी यांच्यावर त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

सातारा जिल्ह्यात सुमारे 20 हजार 350 वृक्षांची लावड होणार आहे. तर पुणे विभागात सुमारे आठ लाख एक हजार 300 वृक्षांची लागवड केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात तीन लाख 42 हजार 600, सोलापूरला 31 हजार 550, सांगलीला दोन लाख 98 हजार 300 तर कोल्हापूरला एक लाख पाच हजार 500 वृक्षांची लागवड केवली जामार आहे. त्यात प्रमुख्याने प्रदुषण नियंत्रणासाठी वृक्ष लागवड तर होणार आहे. शहर सौंदर्यीकरण, जल संवर्धन, सावली व फळ फळावळींसाठी वृक्ष लागवड करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. वृक्ष लावल्यानंतर त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारीही त्या पालिकांचीच आहे. त्यासाठी त्या वृक्षाभोवती संरक्षण कवच बसविण्याची सक्ती आहे. त्या सगळ्याचा आराखडा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्या सगळ्याचा त्रेमासिक अहवाल शासनास द्यायचा आहे. त्याशिवाय सगळ्या कामांचे सोशल ऑडीटही शासन त्रयस्त संस्थेमार्फत करणार आहे. 

ही वृक्षं लावावित...

  • प्रदुषण नियंत्रणासाठी - वड, पिंपळ, तमान, आंबा, शिसम, अगस्ती, चिंच, फणस, बैल, स्पतपर्णी, काशीद, सोनचाफा, मोहर,                       
  • शहर सौदर्यकरणासाठी - शिरीष, पळस, बहावा, कैलासपती, अनंत, आकाशनिम, बकुळ, पारिजातक, अशोक
  • जल संवर्धनासाठी - बांबू, गिरीपुष्प, बोर, चुरंगी, पिपळी
  • सावलीसाठी - पिंपाळ, वड, महुवा, कुसूम, जांभूळ, बेहडा, फणस, आंबा
  • फळफळावळीसाठी - आंबा, आवळा, चिंच, फणस, पेरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

SCROLL FOR NEXT