Forest department assistance of Rs 5 lakh to 'that' family 
पश्चिम महाराष्ट्र

'त्या' कुटुंबास वनविभागाची पाच लाखाची मदत

शिवाजी चौगुले

शिराळा : तडवळे (ता.शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कु.सुफीयान शमशुद्दीन शेख या बालकाच्या कुटुंबाला वनविभागाने पाच लाखाची तातडीची आर्थिक मदत केली. तडवळे येथे दोन कॅमेरे व सापळे लावून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त सुरू केली आहे. 

काल सोमवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास शमशुद्दीन निजामुद्दीन शेख ( वय 27)(मूळगाव आनंदगाव ता.माजलगाव जि .बीड ) हे आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह ऊस तोडणीसाठी तडवळे येथे शेतात गेले होते. तडवळे येथील मानकांडे शेतात कृष्णात शामराव पाटील या शेतकऱ्यांचा ऊस तोडत असताना मुलगा सुफीयान यास निलगिरी झाडाखाली सावलीला मेव्हणीची सात वर्षाची मुलगी तरनुम हिच्या सोबत ठेवले होते. सर्वजण ऊस तोडण्यात मग्न होते.

तरनुम पाणी पीत असताना अचानक उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाठीमागून सुफीयान याच्यावर झडप घालून त्याची मान पकडून त्यास फरफट नेले. त्यात त्या बालकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या कुटुंबास वनविभागाने 15 लाख रुपये देण्याचे जाहीर केली होते. त्यातील पाच लाख रुपयाचा धनादेश मृत बालक बालकाच्या कुटुंबीयांना देण्यात आला. 

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक गजानन चव्हाण, वनक्षेत्रपाल फिरते पथक सांगलीचे युवराज पाटील, वनपाल चंद्रकांत देशमुख,हणमंत पाटील , शिराळा तालुका मुस्लिम समाजाचे अध्यक्ष डी.जी.अत्तार ,अस्लम नदाफ, फिरोज मुजावर, रफिक अत्तार, खलील मोमीन, मेहबूब मुल्ला, गौसमहंमद मुजावर, झाकीर दिवाण,उपस्थित होते. 

दरम्यान बिबट्याच्या या हल्ल्यामुळे तडवळे गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या गावात वनविभागाच्यावतीने दोन सापळे लावून कॅमेरे लावण्यात आले आहेत. वनविभागाने या परिसरात गस्ती पथक सुरू केले आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT