Forest Department Ignored Deforestation at Vaccine Depot belgaum sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : व्हॅक्सिन डेपोत पुन्हा वृक्षतोड

वनसंपदा धोक्यात; वन विभागाचे दुर्लक्ष, पर्यावरणप्रेमींतून नाराजी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव शहराचे फुफ्फुस समजला जाणारा ‘व्हॅक्सिन डेपो’ नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहतो. आता या ठिकाणी पुन्हा वृक्षतोड सुरु झाली आहे. याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले असून पर्यावरणप्रेमींतून संताप व्यक्त केला जात आहे. वन विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन येथील वृक्षतोड रोखावी. तसेच व्हॅक्सिन डेपोचे सौंदर्य अबाधित राखावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून करण्यात येत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात व्हॅक्सिन डेपो असून या ठिकाणी विविध जातीचे शेकडो वृक्ष आहेत. तसेच घनदाट जंगल असल्याने विविध जातीचे पक्षी या ठिकाणी येतात. मात्र, या ठिकाणी नियमित वृक्षतोड होत असल्याने येथील सौंदर्य हरवत चालले आहे. यापूर्वी अनेकवेळा व्हॅक्सिन डेपोत वृक्षतोड करण्यात आली आहे. वृक्षतोडीनंतर पर्यावरणप्रेमींतून संताप व्यक्त केला जातो. मात्र, वन विभाग याकडे दुर्लक्षच करताना दिसतो. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वृक्षतोडीचे प्रकार घडत आहेत. चार दिवसांपूर्वी व्हॅक्सिन डेपोत पुन्हा वृक्षतोड करण्यात आली. याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले.

व्हॅक्सिन डेपोत गेल्या काही वर्षांपासून रोप लागवड कमी व वृक्षतोड अधिक होत आहे. त्यामुळे हा परिसर काही वर्षात नष्ट होईल की काय, अशी भितीही व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी सध्या स्मार्ट सिटीतूनही अनेक विकासकामे केली जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही झाली आहे. व्हॅक्सिन डेपो बचावसाठी पर्यावरणप्रेमींनी मोहीम राबविली आहे. मात्र, वन विभागानेही याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रवाशाने VIDEO केला म्हणून वाचला TTE, तिकीट मागताच तरुणीने स्वत:चे कपडे फाडले; धावत्या ट्रेनमध्ये घातला गोंधळ

‘आधी स्वतःकडे पाहा!’ कतरिनाच्या वाढलेल्या वजनाच्या ट्रोलिंगवर अली जाफरचा संतापला, म्हणाला...

IND W vs BAN W: भारताने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; बांगलादेशविरुद्ध सेमीफायनलसाठी अशी आहे टीम इंडियाची Playing XI

Sardesai Wada in Kasba : छत्रपती संभाजी महाराजांचे महाराष्ट्रातील अखेरचे वास्तव्य असलेला ऐतिहासिक वाडा पडझडीच्या मार्गावर; मुख्यमंत्र्यांकडे संवर्धनासाठी आर्त हाक

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा नवा फॉर्म्युला! 25 नाही तर तब्बल 'इतक्या' जागांसाठी होणार चुरस, काय आहे गणित?

SCROLL FOR NEXT