Former Chairman of Maratha Bank, former General Manager of Kolhapur District Central Bank N. Y. Patil accident case today 
पश्चिम महाराष्ट्र

मराठा बॅंकेचे माजी अध्यक्ष,जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी सरव्यवस्थापक एन. वाय. पाटील यांचे अपघाती निधन ....

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव  : मराठा बॅंकेचे माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे (केडीसी) माजी सरव्यवस्थापक एन. वाय. पाटील (वय 80, रा. सुळगा हिंडलगा) यांचे शनिवार सकाळी अपघाती निधन झाले. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले असताना भाजीवाहू वाहनाने मागून धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी 5.45 सुमारास बेळगाव वेंगुर्ला रोडवर हा अपघात घडला असून अपघाताची नोंद काकती पोलीस ठाण्यात झाली आहे. 

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसातून समजलेली अधिक माहिती

अशी, एन. वाय. पाटील हे सुळगा हिंडलगा येथील राहणारे असून बेळगाव वेंगुर्ला मुख्य रस्त्यावर त्यांचे घर आहे. ते दररोज मॉर्निंग वॉकसाठी बाहेर जात होते. नेहमीप्रमाणे आज सकाळी देखील ते फिरावयास बाहेर गेले होते. मॉर्निंग वॉक आटोपून ते पुन्हा घराकडे येण्यासाठी येत असताना वेंगुर्ला रोडवरील गणपती मंदिर नजिक येताच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या भाजीवाहून वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामुळे ते रक्‍ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. लागलीच अपघातग्रस्त भाजीवाहून वाहनातूनच त्यांना रुग्णालयाकडे नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजल्यानंतर काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला. ते मराठा बॅंकेचे माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे (केडीसी) माजी सरव्यवस्थापक होते. तसेच सीमाभागातील अनेक सहकारी संस्थाना त्यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT