Former MP Dilip Gandhi's son charged with crime
Former MP Dilip Gandhi's son charged with crime 
पश्चिम महाराष्ट्र

माजी खासदार गांधी पुत्रावर गुन्हा, परस्पर केली फवारणी

सकाळ वृत्तसेवा

नगर : दोन दिवसांपूर्वी माजी खासदार दिलीप गांधी यांच्या स्वीय सहायकासह दोघांना पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात फिरत असल्याने शिक्षा केली होती. त्याबाबत सोशल मीडियात वाच्यता झाल्याने गांधी यांनी खुलासा केला. औषध फवारणीचे साहित्य आणण्यासाठी ते दोघे गेले असताना पोलिसांनी त्यांना शिक्षा केली. आता त्या फवारणीमुळेच त्यांचे पुत्र सुवेंद्र यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

परस्पर फवारणी केल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. महानगरपालिकेचे कीटक संहारक सीताराम तोळे यांची ती फिर्याद आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात औषध फवारणी करण्यासाठी राजकीय कार्यकर्ते नगरसेवकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. मात्र, खासगी व्यक्तींकडून सुरू असलेल्या औषध फवारणीमध्ये अवाजवी व बेसुमार औषध फवारणी झाल्यास नागरिकांसाठी ती अपायकारक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने या संदर्भात स्पष्ट निर्णय घेऊन संबंधित महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेकडून औषध फवारणी केली जाईल, खाजगी व्यक्ती, सोसायट्यांनी परस्पर औषध फवारणी करू नये, असा आदेश आहे. 

महानगरपालिकेने ही राजकीय नेत्यांना औषध फवारणीसाठी जंतूनाशकांचा पुरवठा करण्यास नकार दिलेला आहे. खाजगी व्यक्तींना औषध फवारणी करू नये, असेही मनपा आयुक्त यांनी यापूर्वीच सांगितले आहे. असे असतानाही शहरात राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावर उतरून औषध फवारणी करत असल्याने अशा व्यक्तींवर कारवाईचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले होते.
त्यानुसार कीटक संहारक शितोळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहरातील गंज बाजार, कापड बाजार, पारशाखुंट, जुना बाजार येथे सुवेंद्र गांधी व त्यांच्या दोन अनोळखी सहकाऱ्यांनी महापालिकेची परवानगी नसताना औषध फवारणी केली. त्यामुळे सदरचा परिसर निर्जंतूक झाल्याचा चुकीचा संदेश नागरिकांमध्ये गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार पोलिस ठाण्यात भादंवि कलम 188, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT