पश्चिम महाराष्ट्र

Lockdown : जुगारप्रकरणी 44 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

लोणंद (जि.सातारा)  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून तोंडाला मास्क न लावता एकत्र येऊन जुगार खेळणाऱ्या येथील 44 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून या सर्वांना अटक केली आहे.
 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील झारेकरी वस्तीतील 44 ते 45 जण जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून एकत्र येऊन येथील पंजाब कॉलनीत एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत जुगार खेळत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांना माहीतगार सूत्राकडून मिळाली. त्यांच्यासह हवालदार महेश सपकाळ, दत्ता दिघे, संतोष नाळे, श्री. आडसूळ, फैय्याज शेख, श्री. मुळीक, श्री. शिकलगार, श्री. पाडवी, भगवान पवार, संजय जाधव, शिवाजी सावंत, चालक श्री. शिंदे, होमगार्ड श्री. इंगवले यांनी घटनास्थळी जाऊन पंजाब कॉलनीत नव्याने बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावर छापा टाकला.

एकत्रित जुगार खेळत असलेल्या रमेश बनसोडे, प्रदीप पंचकर, भारत पंचकर, कैलास झारेकरी, सटवाजी झारेकरी, रतन प्रधाने, सटवाजी झारीसोनार, रमेश झारेकरी, रामचंद्र झारेकरी, शंकर झारेकरी, दीपक झारेकरी, सटवाजी प्रधाने, अशोक झारेकरी, मारुती पंचकर, भीमा पंचकर, आनंद झारेकरी, राजू झारेकरी, गणेश जावीर, राजकुमार झारेकरी, मनोज प्रधाने, इरा झारेकरी, संजय पंचकर, विजय पंचवर, मिथून झारेकरी, मारुती झारेकरी, भीमा सोनझारी, अजित झारेकरी, राजा झारी, सचिन झारेकरी, शंकर झारेकरी, उमेश पंचकर, सूरज प्रधाने, अनिल पंचमे, मोतिराम झारेकरी, जितेंद्र पंचकर, गोपाळ झारेकरी, श्‍याम झारेकरी, भारत झारेकरी (सर्व रा. लोणंद झारेकरी वस्ती) या 44 जणांना पकडून अटक केली.

या सर्वांवर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून जुगार खेळल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी करत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT