Four arrested for robbery
Four arrested for robbery 
पश्चिम महाराष्ट्र

संशय वॉचमनकडे; माल निघाला चोराकडे 

सूर्यकांत वरकड

नगर : एमआयडीसीतील स्विचगिअर कंपनीतून तांब्याच्या तारेसह चार लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. संशयावरून कंपनी मालकाने सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, तपासाअंती चोर दुसरेच निघाले. त्यांतील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. 


भीमा सोपान मिरगे (रा. सावेडी), कैलास राजेंद्र जाधव (रा. बोल्हेगाव), अजय सोपान गुळवे (रा. नालेगाव), सागर मच्छिंद्र वाघमारे (रा. निंबळक), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात संतोष धोत्रे, पप्पू ऊर्फ गोरख संभाजी जाधव, बबलू ऊर्फ पीरमहंमद शेख, सुंदर खंडागळे यांची नावे निष्पन्न झाली आहेत.

अधिक माहिती अशी ः एमआयडीसीतील स्विचगिअर प्रायव्हेट लिमिटिड कंपनीतून 25 ऑक्‍टोबर रोजी रात्री वाचला मारहाण करून चार लाख 14 हजारांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत कंपनी मालकाने सुरक्षारक्षक विष्णू रावजी चोरमले याने अन्य साथीदारांच्या मदतीने चोरी केली, अशी फिर्याद पोलिस ठाण्यात दिली.

गुन्ह्याचे तपासी अधिकारी उपनिरीक्षक पवन सुपनर यांना माहिती मिळाली, की चोरी वॉचमनने केलेली नसून, अन्य सराईत गुन्हेगारांनी केली आहे. त्यानुसार तपास करून पोलिसांनी वरील चार आरोपींना गजाआड केले. त्यांनी संतोष धोत्रे, पप्पू ऊर्फ गोरख संभाजी जाधव यांच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक चौकशी केली असता, चोरीचा माल त्यांनी बबलू ऊर्फ पीरमहंमद शेख, सुंदर खंडागळे यांना विकल्याचे सांगितले.

पोलिसांनी शोध घेतला असता ते आढळून आले नाही. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, उपनिरीक्षक पवन सुपनर, पोलिस नाईक देवेंद्र पांढरकर यांच्या पथकाने केला. 

वॉचमनला नोकरी देऊ 
कंपनीच्या मालकाने वॉचमनवर संशय घेऊन फिर्याद दिल्याने तो आरोपीही झाला आणि त्याची नोकरी गेली. मात्र, गुन्ह्याची उकल झाल्याने तो निरपराध आहे. त्याला नोकरी देण्यासाठी कंपनीमालकाकडे विनंती करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT