कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर पलटी झालेली क्रुझर. Sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणी : कोगनोळीजवळ अपघातात चार जण जखमी

क्रुझर व मोटार सायकल यांच्यात अपघात झाला.

सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी - येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ ऑफिसनजीक क्रुझर व मोटारसायकल यांचा अपघात होऊन चार जण जखमी झाले. शुक्रवारी (ता. २९) सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, क्रुझर (केए २४, ३७४९) निपाणीहून औद्योगिक वसाहतीकडे जात होती. याचदरम्यान स्प्लेंडर मोटारसायकल (एम ०९ एफएफ १६४९) घेऊन माणिक मुरलीधर पाटील (वय २६, रा. सौंदलगा) हे औद्योगिक वसाहतीकडे जात होते. क्रुझर व मोटार सायकल यांच्यात अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला, हे समजू शकले नाही. दहा प्रवाशांना घेऊन जाणारी क्रुझर रस्त्याच्या मधोमध पलटी झाली. त्यातील तिघेजण जखमी झाले. मोटार सायकलस्वार माणिक पाटील यांच्या डोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाले. घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलिस चौकीचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. आय. कंबार, शिवप्रसाद, राजू गोरखनावर, संदीप वडर, पी. डी. घस्ती यांनी भेट देऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अबरार अहमदला करारबद्ध करणाऱ्या काव्या मारनच्या SRH ला सुनील गावस्करांनी सुनावले; म्हणाले, या पैशातून ते आपले जवान मारतात...

Mumbai: गाड्यांवरील लुकलुकणारे दिवे हटवले, वादंगानंतर पालिका प्रशासनाची तातडीची कारवाई

चिंता वाढली! वॉकिंग स्टिकचा आधार घेत BCCI पुरस्कारांसाठी पोहचला टीम इंडियाचा खेळाडू; VIDEO

Latest Marathi Update : गोरेगावात चुलीवर शिजतेय गरीबांची शिव भोजन थाळी

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

SCROLL FOR NEXT