Four killed, one injured in two accidents 
पश्चिम महाराष्ट्र

दोन अपघातांत चार ठार, एक जखमी 

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : नगर-दौंड महामार्गावरील काष्टी व चिखली शिवारात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत चार जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैशाली अजय सोनवणे (वय 20), मंदाबाई बोरसे (वय 30, रा. पडावेत, ता. सिंदखेडा, जि. धुळे), सचिन दत्तात्रय बारगुजे (वय 35), अशोक नानासाहेब पवार (वय 49, रा. घोटवी, ता. श्रीगोंदे), अशी मृतांची नावे आहेत. 

सिंदखेडा येथील ऊसतोडणी कामगार सांगली जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी गेले होते. हंगाम संपल्याने ते सांगली येथून टेम्पोतून (एमपी 09 जीएन 3888) साहित्यासह गावी निघाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाचच्या सुमारास टेम्पो काष्टी शिवारातील राहिंजवाडी येथे आला असता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला (एमएच 16 एवाय 9775) त्याने पाठीमागून जोराची धडक दिली.

या धडकेत टेम्पोत बसलेल्या वीस प्रवाशांपैकी वैशाली सोनवणे व मंदाबाई बोरसे ठार झाल्या. अजय सोनवणे गंभीर जखमी झाले. टेम्पोतील अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. 

दुसरा अपघात नगर-दौंड महामार्गावरील चिखली घाटानजीक काल (गुरुवारी) रात्री नऊच्या सुमारास घडला. त्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सचिन बारगुजे व अशोक पवार हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. बेलवंडी पोलिसांनी सांगितले, की वरील दोघे नगर येथे कांदाविक्री करून घोटवी गावाकडे निघाले होते. चिखली घाटात त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यात दोघे जागीच ठार झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT