618OY2bphML._SY450_.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मिरज गोदामातून  चार लाखांचे एलईडी गायब 

प्रमोद जेरे

मिरज (सांगली) ः शहरातील आकाश इलेक्‍ट्रॉनिक्‍स या टीव्ही शोरूमच्या गोदामातून चोरट्यांनी तब्बल चार लाख रुपयांचे एलईडी लंपास केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शहरात मार्केट परिसरात आकाश इलेक्‍ट्रॉनिक्‍स हे टीव्हीचे मोठे शोरूम आहे. त्याचे गोदाम बस स्थानक रस्त्यावरील एपी बेकरीच्या पिछाडीस आहे. शोरूममधील टीव्हीचा हिशेब लागत नसल्याने कर्मचाऱ्यांना घेऊन शोरूमचे मालक सुरज मनोहर पंजवानी हे गोदामात गेले. गोदामाच्या छताचे पत्रे नट बोल्ट काढून उचकटल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी गोदामाची पाहणी केली. चोरट्यांनी छताचे पत्रे उचकटून गोदामात प्रवेश केल्याचे आणि तेथूनच मोठ्या कंपन्यांचे तब्बल 22 एलईडी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. हे 22 एलईडी नेण्यासाठी चोरट्यांनी एखाद्या मोठ्या वाहनाचा वापर केला असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.

चोरट्याने गोदामात प्रवेश केल्यानंतर छताच्या पत्र्याचे नट बोल्ट उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर सीसीटीव्ही बंद केला आणि एलईडीवर हात मारला. चोरून नेलेल्या एलईडीत ओनिडा, सॅमसंग, एज या कंपनीच्या 32 ,42 आणि 43 इंचाच्या एल ई डींचा समावेश आहे. 

संपादन ः अमोल गुरव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT