four members from farmer family commits suicide in Parner Nagar 
पश्चिम महाराष्ट्र

नगर : पारनेरमध्ये पत्नी, दोन मुलांसह शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

निघोज (नगर) : गुणोरे (ता. पारनेर) येथील एका तरुण शेतकऱ्याने आज पत्नी व दोन अल्पवयीन मुलांसह गळफास घेऊन पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली. पत्नी व मोठ्या मुलाचे सततचे आजारपण व त्यातून निर्माण झालेल्या अर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सकाळी उघडकीस आलेल्या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ भयचकीत झाले असून, बढे यांच्या घरासमोर मोठी गर्दी झाली आहे.

बाबाजी विठ्ठल बढे (वय 35), त्यांची पत्नी कविता (वय 34), मोठा मुलगा आदित्य (वय 16) व लहान मुलगा धनंजय (वय 14) अशी यातील मयत चौघांची नावे आहेत. बढे यांची चुलत बहिण रेखा सुभाष गागरे आज सकाळी दूध आणण्यासाठी बढे यांच्या घरी गेली होती. त्या वेळी त्यांना बढे यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसले. रेखा हीने याची माहिती पती सुभाष गागरे यांना दिली. सुभाष यांनी घटनास्थळी पोचून बढे यांना आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गागरे यांनी बढे यांच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले. समोरचे दृश्‍य पाहून गागरे भयचकीत झाले. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना व ग्रामस्थांचा घटनेची कल्पना दिली. ग्रामस्थांनी ही माहिती तत्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस पथकही तातडीने दाखल झाले आहे. त्याचा पंचनामा सुरु आहे.

तरुण शेतकरी बाबाजी यांची पत्नी कविता गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांचा मोठा मुलगा आदित्य अपंग होता. तो देखील आजारी असल्याने घरीच असायचा. त्यात घरची आर्थिक स्थितीही हालाखीची होत गेली. बाबाजी यांच्याकडे चार गायी आहेत. त्यावरच बढे कुटुंबाची गुजराण होती. शेतीमध्येही सारखी दुष्काळी स्थिती असल्याने फारसे उत्पन्न हाती लागत नव्हते. त्यातच बाजारभाव मिळत नसल्याने अर्थिक स्थिती कमकुवत होत गेली. त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण तयार झाल्याने बाबाजी यांची पत्नी कविता या बाजूच्या महिलांशी नेहमी मरणाच्या विषयावर चर्चा करायची, असे समजते.

दरम्यान, या घटनेत बाबाजी यांनी अगोदर पत्नी व दोन मुलांना गळफास दिला. त्यानंतर स्वत: गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT